(Source: ECI/ABP News/ABP Majha)
N. D. Patil : शेकापचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील अनंतात विलीन! कोल्हापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
महाराष्ट्राच्या पुरोगामी, डाव्या चळवळीतील अग्रणी आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे काल निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी कोल्हापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले
N. D. Patil : शेकापचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्यावर कोल्हापुरातील कसबा बावडा येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. एन. डी. पाटील यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना मुखाग्नी दिला.
महाराष्ट्राच्या पुरोगामी, डाव्या चळवळीतील अग्रणी आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांचे काल निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी कोल्हापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचे पार्थिव रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शाहू कॉलेजच्या प्रांगणात ठेवण्यात आले होते.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक नेते अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते.
दरम्यान, आज सकाळी छत्रपती शाहू कॉलेजच्या प्रांगणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह माहाष्ट्रातून आलेल्या नेतेमंडळींनी एन. डी. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी दिवंगत प्रा. एन. डी.पाटील यांच्या पत्नी सरोज उर्फ माई, मुलगा प्रशांत व सुहास पाटील यांच्यासह कुटुंबातील अन्य सदस्य, खासदार, आमदार, शिक्षण, सहकार क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी, कामगार, नागरिक यांनीही प्रा.एन.डी. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
गेल्या काही दिवसांपासून एन. डी. पाटील आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. या लढवय्या नेत्याची झुंज 93 व्या वर्षी संपली. कोल्हापुरातील (Kolhapur) अॅपल सरस्वती रुग्णालयात त्यांनी काल अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्रातील विवेकी आवाज, पुरोगामी चेहरा, संघर्ष योद्धा, रचनात्मक लढाईचे निर्माते, सीमा लढ्याचा नेता, सेझविरुद्ध लढ्याचा कॅप्टन, रयत शिक्षण संस्थेचा चारित्र्यसंपन्न चेहरा असं ऑल राऊंडर व्यक्तीमत्व म्हणजे एन डी पाटील होते. जिथे जिथे संघर्ष, तिथे तिथे एन डी पाटील हे नाव होतंच होतं. ज्या लढाईत एन डी पाटील उतरले, तिथे विजय पक्का असा विश्वास आंदोलनकर्त्यांना होता.
महत्वाच्य बातम्या
- N. D. Patil : एनडींनी घोषणा दिली, टोलची खोकी पंचगंगेत बुडवू, जे देशात कुणालाही जमलं नाही ते एन डींनी करुन दाखवलं!
- मी आत्याला मस्करीत म्हणायचे, एन डी मामांबरोबर संसार करतेस, तुला अॅवॉर्डच द्यायला हवा : सुप्रिया सुळे
- N D Patil : रचनात्मक लढाईचा निर्माता, सीमा लढ्याचा नेता, सेझ लढ्याचा कॅप्टन, एन. डी पाटलांची धगधगती कारकीर्द