धक्कादायक! डी मार्टमधून आणलेल्या बिस्किट पुड्यातच निघाल्या अळ्या, ग्राहक आक्रमक, कारवाई करण्याची मागणी
मरावतीत बिस्किट पुड्यात चक्क अळ्या आढळल्याचा प्रकार घडला आहे. नारायण कराडे यांच्या घरी हा प्रकार घडला आहे. नारायण कराडे यांनी दुपारी शहरातील डी मार्ट मॉलमधून अनेक वस्तू खरेदी केल्या होत्या.
Amravati News : अमरावतीत बिस्किट पुड्यात चक्क अळ्या आढळल्याचा प्रकार घडला आहे. नारायण कराडे यांच्या घरी हा प्रकार घडला आहे. नारायण कराडे यांनी दुपारी शहरातील डी मार्ट मॉलमधून अनेक वस्तू खरेदी केल्या होत्या. यासोबतच बिस्कीटांची देखील खरेदी केली होती. मात्र, घरी आल्यानंतर बिस्किट उघडताच त्यातून अळ्या बाहेर पडल्याचे प्रकार घडला. यामुळं ग्राहकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी आता नारायण कराडे यांनी केली आहे.
अन्न व औषधी प्रशासन या गंभीर विषयाची दखल घेणार का?
बिस्किटात अळ्या निघाल्याने नारायण कराडे आक्रमक झाले आहेत. त्यांनी या प्रकरणी कारवाई करण्याची मागमी देखील केली आहे. त्यामुळं आता त्यांच्या या मागणीवर अन्न व औषधी प्रशासन या गंभीर विषयाची दखल घेणार का याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
अनेकवेळा शालेय पोषण आहारातही अळ्या निघाल्याचा प्रकार
शालेय विद्यार्थ्यांना शाळेसोबत शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र या योजनेसाठी पुरवठा केला जाणार आहारातील माल निकृष्ठ दर्जाचा पुरवठा होत असल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असल्याचा सवाल उपस्थित केला गेला आहे. शाळेत शालेय पोषण आहारासाठी या अगोदर अळ्या, किडे, पाल पडल्याने विषबाधा झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. अशा प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी देखील होत आहे. शाळेत निकृष्ट दर्जाचं शालेय पोषण आहार देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, आता मॉलमध्ये मिळणाऱ्या मालात देखील अळ्या निघाल्याचा प्रकार समोर आल्यानं संताप व्यक्त केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या: