Lalit Patil : ललित पाटीलसंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा, संबंधित मंत्र्यांची चुप्पी; देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषद घेणार
Lalit Patil Drugs Case : शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी दादा भुसे आणि शंभुराज देसाई यांच्यावर आरोप केले होते.
मुंबई: ड्रग्ज तस्कर ललित पाटील (Lalit Patil Drugs Case) प्रकरणी विरोधी पक्षाकडून दोन मंत्र्यांवर आरोप होत असताना त्यावर गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित मंत्र्यांनी बैठकीत चुप्पी साधल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे. याच प्रकरणावरून आज दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे फडणवीस आज कोणता मोठा खुलासा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ललित पाटील आणि त्यावरून राज्याच्या मंत्र्यावर होणाऱ्या आरोपांवर चर्चा करण्यात आली. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी दादा भुसे आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नावं घेतली होती. गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमक्या याच विषयावर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यावेळी संबधित मंत्र्यांनी बैठकित चुप्पी साधल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. मात्र यावर शुक्रवारी सविस्तर उत्तर देईन म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ मारून नेल्याची सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान याबाबत आज दुपारी देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार असल्याची माहिती मिळते. दोन दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणी बोलताना म्हटलं होतं की, ललित पाटील सापडला आहे. आता या प्रकरणी मोठं रॅकेट समोर येणार असून अनेक मोठे गौप्यस्फोट होतील. राज्यातल्या ड्रग्ज रॅकेटचा उलगडा होईल.
फडणवीसांनी म्हटल्याप्रमाणे आज ते कोणता मोठा खुलासा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, सुषमा अंधारे यांनी आपली माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर मानहानीचा दावा करणार असा इशारा दादा भुसे आणि शंभुराज देसाई यांनी दिला होता. त्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray camp) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी ललित पाटील (Lalit Patil drugs case) ड्रग्जप्रकरणावरुन पुन्हा एकदा उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावर हल्लाबोल केला."शंभूराज देसाई म्हणाले माफी मागा नाहीतर.... त्यांच्या "नाही तर" या शब्दाचा अर्थ काय? मला धमकी देत आहे का?" असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला. त्या नागपुरात (Sushma Andhare Nagpur) बोलत होत्या.
शंभूराज देसाईंसोबत माझं वैयक्तिक वैर नाही. त्यांच्या खात्याशी संबंधित जर विषय असेल तर त्यांनाच विचारणार. राज्याचं उत्पादन शुल्क खातं शंभूराज देसाईंकडे आहे. तो विभाग सपशेल अपयशी आहे. मी जे काल बोलले, त्यामधून मी एक ही शब्द मागे घेणार नाही. माफी मागण्याचा तर प्रश्नच नाही, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
ही बातमी वाचा: