एक्स्प्लोर
आपण झुंडशाहीला बळी पडलो, माजी संमेलनाध्यक्षांचा घणाघात
सहगल यांना निमंत्रण देऊन ते नाकारणं ही बाब साहित्य महामंडळासाठी आणि साहित्य संमेलनाच्या परंपरेसाठी लाजीरवाणी आहे अशी घणाघाती टीका देशमुख यांनी केली. नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीचा मी निषेध करतो या संपूर्ण प्रकरणात महामंडळ कमी पडलं असंही मत देशमुख यांनी व्यक्त केलं.
यवतमाळ : नयनतारा सहगल यांचे आमंत्रण मागे घेणे हे अनुचित आहे. आपण झुंडशाहीला बळी पडलो आहोत. सहगल आल्या असत्या आणि भाषण केलं असत तर काही राजकीय आभाळ कोसळलं नसतं, अशा शब्दात माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी घणाघात केला आहे. नयनतारा सहगल यांचा साहित्य कर्तृत्वाला सलाम करतो आणि भाषणाला सुरूवात करतो, अशा शब्दात त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.
मी उदास आहे, चिंतित आहे, या प्रकरणाने महाराष्ट्राची मान खाली गेली आहे. मी निमंत्रण वापसीचा निषेध करतो, असे म्हणत देशमुख यांनी नयनतारा सहगल यांच्या नियोजित भाषणाचा एक उतारा वाचून दाखवला. भारतात जे काही वातावरण सध्या निर्माण झाले आहे त्यामुळे साहित्यिक कलाकार यांना बोलू दिले जात नाही. त्यामुळे देशात असहिष्णुता निर्माण झाली आहे. नयनतारा सहगल यांना निमंत्रण देऊन ते नाकारणं ही बाब साहित्य महामंडळासाठी आणि साहित्य संमेलनाच्या परंपरेसाठी लाजीरवाणी आहे अशी घणाघाती टीका देशमुख यांनी केली. नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीचा मी निषेध करतो या संपूर्ण प्रकरणात महामंडळ कमी पडलं असंही मत देशमुख यांनी व्यक्त केलं.
यवतमाळ जिल्हयात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला भाव दिले पहिजे, असेही ते म्हणाले. यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते आहे. नयनतारा सहगल यांच्या विचारांना मी सलाम करतो असेही लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळावं म्हणून त्या कायम झगडल्या.
दादरी येथील अश्पाक हत्याकांडांचा निषेध म्हणूनही त्यांनी पुरस्कार वापसी केली. नयनतारा सहगल या बाणेदार शैलीच्या आहेत. कऱ्हाडच्या साहित्य संमेलनात दुर्गा भागवत यांनी जसा आणीबाणीविरोधात आवाज उठवला होता, तसाच आवाज समाजातल्या अन्यायाविरोधात सहगल यांनी उठवला आहे. पाहुण्याला बोलवायचं आणि मग येऊ नका म्हणायचं हे चांगलं झालेलं नाही यासाठी मी चिंतेत आहे, असे ते म्हणाले.
देशाला आणि महाराष्ट्राची सहिष्णू परंपरा लोप पावते आहे का? असाही प्रश्न मला यामुळे पडला. भारतात आपण धार्मिक विविधता आहे तरीही ऐक्य आहे मात्र ही गोष्ट आपण मागे सोडतो आहोत का? अशी चिंता सहगल यांनी म्हटलं होतं. त्यांची ही खंत योग्यच आहे असेही देशमुख यांनी म्हटले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement