एक्स्प्लोर
बोरीवलीत ट्रेनखाली अडकलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
मुंबई : बोरीवलीमध्ये रेल्वेत चढताना तोल जाऊन रेल्वे कोच आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बोरीवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म 6 वर हा अपघात झाला होता.
बोरीवलीच्या प्लॅटफॉर्म 6 वर उभ्या असलेल्या सौराष्ट्र जनता एक्स्प्रेसमध्ये चढताना 45 वर्षीय शर्मिलाबेन पटेल कोच आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकल्या. रविवारी संध्याकाळी 6 वाजता हा प्रकार घडला. त्यांना बाहेर काढण्यासाठी आरपीएफ, हमाल आणि काही प्रवाशांनी कोचखाली उतरुन खेचून बाहेर काढलं. उपचारादरम्यान शर्मिलाबेन यांचा मृत्यू झाला आहे.
महिलेला वाचवण्यासाठी आरपीएफ जवान कोचखाली उतरले असताना प्लॅटफॉर्म 5 वरुन जलद ट्रेन जात होती. यावेळी प्रसंगावधान राखत एका प्रवाशाने पुढे जाऊन ती ट्रेन थांबवल्यामुळे दुर्घटना टळली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement