कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण
कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. नुकतीच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली
मुंबई : कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. नुकतीच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांची प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. या बाबतची माहिती दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करुन दिली आहे.
आपल्या ट्वीटमध्ये दिलीप वळसे पाटील म्हणाले, नुकतीच माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोणाची चाचणी करून घ्यावी. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन.
आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन. धन्यवाद!
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) October 29, 2020
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, देवेंद्र भुयार, राहुल नार्वेकर, गोपीचंद पडळकर, प्रवीण पोटे या आमदारांना कोरोनाची लागण झाली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या :