एक्स्प्लोर
कोरेगाव भीमा हिंसाचार : राहुल फटांगडे हत्येप्रकरणी तिघांना अटक
दरम्यान राहुलच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या राहुल फडांगडेच्या हत्येप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या तिघांनीही राहुलची हत्या केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. हे तिन्ही आरोपी अहमहनगरमधील आहेत.
बुधवारी दिवसभराच्या कारवाईनंतर पोलिसांनी एकूण आठ जणांना अटक केली. त्यात राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी तिघांना तर उर्वरित पाच जणांना सणसवाडीतल्या हिंसाचाराप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या 51 वर पोहोचली आहे.
दरम्यान राहुलच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर इतरांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
राहुल फटांगडेच्या कुटुंबीयांना मदत
1 जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमामध्ये उफाळलेल्या हिंसाचारात राहुल फटांगडेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अनेक संघटनांकडून मृत राहुलच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली होती.
यानंतर राहुल फटांगडेच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून दहा लाख रुपयांची मदत सुपूर्द करण्यात आली आहे.
कुटुंबाकडून शांततेचं आवाहन
महाराष्ट्रवासियांनो फुले, शाहू आंबेडकरांचा वारसा विसरु नका अशी संयमी भूमिका भीमा-कोरेगावच्या हिसांचारात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी घेतली.
घरातील पाण्याचा नळ आणण्यासाठी बाहेर पडलेल्या राहुल फटांगडेचा भीमा-कोरेगावच्या हिंसाचारात हकनाक बळी गेला. मात्र, तरीही राहुलच्या कुटुंबाने शांतेतचं आवाहन केलं आहे. दरम्यान, समाजातील लोकांनी एकमेकांना समजून घेतलं तर दंगली घडणार नाही. असंही मत त्यांच्या कुटुंबीयांनी यावेळी व्यक्त केलं.
नेमकं प्रकरण काय?
1 जानेवारीला कोरेगाव-भीमा रणसंग्रामाला 200 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना कोरेगाव-भीमा गावाच्या परिसरात दोन गटांमध्ये वाद उफाळला. त्या वादाचं पर्यवसान हाणामारीमध्ये झालं आणि त्यातून अनेक गाड्यांची तोडफोड, जाळपोळ आणि दगडफेक झाली.
या धुमश्चक्रीला आवरण्यासाठी आलेल्या राज्य राखील दलाच्या तुकडीवरही जमावाने हल्ला चढवला होता. या हिंसाचारात एका तरुणाचा मृत्यूही झाला होता.
संबंधित बातम्या :
कोरेगाव-भीमा हिंसाचारातील मृत राहुल फटांगडेच्या कुटुंबाला मदत
कोरेगाव-भीमामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाकडून शांततेचं आवाहन
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल
संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघाने इतिहासाची मोडतोड केली : भिडे गुरुजी
‘मला अडकवण्यासाठी कौरवनितीचा वापर’, भिडे गुरुजींची पहिली प्रतिक्रिया
देशाचे तुकडे होण्याआधी मी मरण पत्करेन : उदयनराजे
भिडे गुरुजी वडीलधारे, त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांची लायकी नाही : उदयनराजे
प्रकाश आंबेडकरांच्या आरोपांवर भिडे गुरुजींचं स्पष्टीकरण
कोरेगाव-भीमामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाकडून शांततेचं आवाहन
कोरेगाव भीमातील हिंसाचार सरकारच्या हलगर्जीमुळे : ग्रामस्थ
थर्टी फर्स्ट ते महाराष्ट्र बंद, पोलीस ऑन ड्युटी 72 तास
भिडे गुरुजींवरील गुन्हा मागे घ्या, सांगलीत समर्थनार्थ मोर्चा
दलित तरुणांची धरपकड तात्काळ थांबवावी : प्रकाश आंबेडकर
दलित समाज धाकटा भाऊ, सर्वांना एकत्र नांदायचं आहे : छत्रपती संभाजीराजे
सणसवाडी दगडफेकीच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद
पुण्यातील सणसवाडीत दोन गटात वाद, परिस्थिती नियंत्रणात
सणसवाडी दगडफेकीची न्यायालयीन चौकशी होणार : मुख्यमंत्री
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement