एक्स्प्लोर
Advertisement
कोल्हापूरचे वीरपुत्र राजेंद्र तुपारे यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार
श्रीनगर : पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले कोल्हापूरचे वीरपुत्र राजेंद्र तुपारे यांच्यावर उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. जम्मूतील पुंछमध्ये नियंत्रण रेषेवर झालेल्या गोळीबारात राजेंद्र तुपारे रविवारी शहीद झाले होते.
राजेंद्र तुपारे यांचं पार्थिव आज संध्याकाळी 5.30 च्या सुमारास बेळगाव विमानतळावर पोहोचणार आहे. त्यानंतर त्यांचं पार्थिव चंदगड तालुक्यातील कारवे या मूळगावी नेण्यात येईल. तर उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
शहीद राजेंद्र तुपारेंचं पार्थिव आज कोल्हापुरातील मूळगावी आणणार
कोण होते राजेंद्र तुपारे? शहीद राजेंद्र तुपारे हे कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातील कारवे गावचे सुपुत्र आहेत. 1983 साली जन्मलेले राजेंद्र तुपारे हे 2002 साली बेळगाव इथल्या मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये रुजू झाले होते. सध्या ते पुंछमध्ये सीमेवर तैनात होते. राजेंद्र तुपारे यांनी 14 वर्षे भारतमातेची सेवा केली, मात्र रविवारी शत्रूशी लढताना त्यांना वीरमरण आलं. राजेंद्र तुपारे यांच्या पश्चात पत्नी, दोन आर्यन (वय 9 वर्षे) आणि वैभव (वय 5 वर्षे) अशी दोन मुलं आणि आई-वडील आहेत.पाकच्या गोळीबारात कोल्हापूरचे सुपुत्र राजेंद्र तुपारेंना वीरमरण
कारवे गावावर शोककळा शहीद राजेंद्र तुपारे यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या कारवे गावावर शोककळा पसरली आहे. तुपारे कुटुंबाला समाजकार्याची पार्श्वभूमी आहे. कुटुंबाच्या सांत्वनासाठी कालपासूनच कारवेमध्ये रांगा लागल्या आहेत.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement