एक्स्प्लोर
करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची पुन्हा झीज

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची पुन्हा झीज होत असल्याचं समोर आलं आहे. दोन वर्षांपूर्वी अंबाबाईच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती. पण ती प्रक्रिया कुचकामी ठरली का काय? असा सवाल भक्त विचारत आहेत. मंदिरातील देवीची मूर्ती दोन हजार वर्षांपूर्वीची असल्याची आख्यायिका आहे. त्यामुळं मूर्तीची झिज होत असल्याचं लक्षात येताच पुरातत्व खाते आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं 2015 साली मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर पुढच्या 100 वर्षात मूर्तीला काही होणार नाही, असा दावाही करण्यात आला होता. पण आता या मूर्तीवर पांढरे डाग दिसू लागले आहेत आणि रासायनिक थरही निघत आहे. त्यामुळे संवर्धन प्रक्रियेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, देवीच्या गाभाऱ्यातली आद्रता कमी करण्यासाठी देवस्थान समिती प्रयत्न सुरु असल्याचं सांगत आहे. पण तरी दिवसेंदिवस भक्तांची वाढती गर्दी आणि गाभाऱ्यातील तपमानामुळंच मूर्तीची झीज होत आहे. त्यामुळं आता याबाबत देवस्थान समिती काय निर्णय घेते हे पहावं लागणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























