Kolhapur News : 'दिवस वेदनांचा दौड मशालीची'! ठाकरे गटाकडून कोल्हापूर ते बेळगाव मशाल रॅली, विरोध केल्यास गनिमी काव्याने प्रवेश करणार
Kolhapu News : एक नोव्हेंबर हा दिवस सीमा भागातील मराठी बांधव काळा दिवस म्हणून पाळतात. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज कोल्हापुरातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक बेळगावला जाणार आहेत.
![Kolhapur News : 'दिवस वेदनांचा दौड मशालीची'! ठाकरे गटाकडून कोल्हापूर ते बेळगाव मशाल रॅली, विरोध केल्यास गनिमी काव्याने प्रवेश करणार Kolhapur to Belgaum flame rally by Uddhav Balasaheb Thackeray faction Kolhapur News : 'दिवस वेदनांचा दौड मशालीची'! ठाकरे गटाकडून कोल्हापूर ते बेळगाव मशाल रॅली, विरोध केल्यास गनिमी काव्याने प्रवेश करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/31/a2cf8ca3afcb5fe899e2668ac93ab36e166720058683488_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kolhapu News : एक नोव्हेंबर हा दिवस सीमा भागातील मराठी बांधव काळा दिवस म्हणून पाळतात. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज कोल्हापुरातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक बेळगावला जाणार आहेत. राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळापासून मशाल दौड निघणार आहे. शिवसेनेच्या वतीने 'दिवस वेदनांचा दौड मशालीची' या टॅगलाईन खाली क्रांतीची मशाल घेऊन छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ येथून बेळगावला (Belgaum) रवाना होईल. कर्नाटक सरकारकडून रॅली अडवल्यास पर्यायी मार्गने बेळगावमध्ये पोहोचणार आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ देण्यासाठी शिवसेनेतफे 'दिवस वेदनांचा, दौड मशालीची' या रॅलीचे आयोजन केले आहे. बेळगाव येथे 1 नोव्हेंबरला काळा दिन' पाळला जातो. रॅलीत सुमारे एक हजारो शिवसैनिक सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी दिली आहे.
विजय देवणे यांनी माहिती देताना सांगितले की, 'धगधगती मशाल' स्वराज्याचे प्रतिक आहे. त्यामुळे ही धगधगती मशाल आणि भगवा झेंडा घेवून काळ्या पट्ट्या बांधून रॅली बेळ्गावच्या दिशेने रवाना होईल. कोल्हापुरातून ही रॅली निघणार असून, कागल, कोगनोळी, निपाणी, संकेश्वर, हत्तरगीमार्गे बेळगावमध्ये पोहोचेल. रॅलीत ठिकठिकाणी कार्यकर्तें सहभागी होतील.
संजय पवार म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज समाधी येथे मशाल आणि भगव्या झेंड्याच्या पुजनासाठी बेळगाव, निपाणीमधून महाराष्ट्र एकीकरण समितीचे आणि शिवसेनेचे बेळगाव, निपाणीतील नेते दीपक दळवी, मालोजीराव अष्टेकर, मनोहर किणेकर, शिवाजी सुंठकर, शुभम शेळके, प्रकाश शिरोळकर, प्रकाश मरगाळे, सचिन गोरले, दिलीप बैलुरकर, किरण गावडे यांना निमंत्रित केले आहे. येथून सुमारे पंचवीस चारचाकी वाहनांमधून ही मशाल रॅली रवाना होईल.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)