एक्स्प्लोर
Advertisement
कुत्र्यापासून नव्हे... कोंबड्यापासून सावध रहा, कोल्हापूरचा अँग्री बर्ड
'कुत्र्यांपासून सावधान' अशी पाटी आपण आतापर्यंत पाहिली किंवा वाचली असेल. किंबहुना एखाद्या घरात जाताना तुम्हाला कुत्र्यांनी त्रासही दिला असेल. पण कोल्हापुरात असं एक घर आहे जिथं कुत्र्यापासून नाही तर कोंबड्यापासून सावध राहावं लागतं.
कोल्हापूर : 'कुत्र्यांपासून सावधान' अशी पाटी आपण आतापर्यंत पाहिली किंवा वाचली असेल. किंबहुना एखाद्या घरात जाताना तुम्हाला कुत्र्यांनी त्रासही दिला असेल. पण कोल्हापुरात असं एक घर आहे जिथं कुत्र्यापासून नाही तर कोंबड्यापासून सावध राहावं लागतं.
घरात घुसलासा... तर बगाच... पाटी वाचाय न्हाईसा.. कोंबड्यापासनं सावध राहा... व्हय व्हय... कोंबड्यापासनंच.. कुत्र्यापासनं न्हंवं.. ती कुत्री नुसती भुकत्यात... आमचा गब्बरसिंग मागं लागतोय... मागं लागला... की पाय लावून पळायचं... न्हाई तर टोचा मारुन वाट लावतंय...
कोल्हापुरातल्या बावड्यात दहशत हाय भावाची... लाल भुंद तुर्रार्रा... गळ्याला राजकुमारसारखी सोनेरी मफलर... आणि सकाळी केकाटलं.. की आख्ख्या बावड्याला उटीवतंय...
गेटमधनं कोन येताना दिस्ला... विषय सप्ला... गब्बरसिंग तेला पळवून लावतंय... खरं तर गटारीलाच तेची तंगडी लटकली असती... गब्बरचा पांडरा रस्सा झाला आस्ता... पन गब्बर फेमस झाला... आनी मालकानं चिकनचा बेत रद्द केला...
काय करनार भावा... पावसाळा आसू दे न्हाईतर हिवाळा... आमचा नादच निराळा..
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
व्यापार-उद्योग
क्राईम
Advertisement