एक्स्प्लोर
मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात राजघराणी रस्त्यावर
महाराणी ताराबाईंच्या पुतळ्याजवळ भगवा ध्वज फडकावून शहरात रॅली काढण्यात आली. त्यानंतर दसरा चौकात आरक्षणाच्या मागणीसाठी ठाण मांडून बसलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी पाठिंबाही दिला.
कोल्हापूर: मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी कोल्हापुरात विविध राज घराण्यातील मंडळी आज रस्त्यावर उतरली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ज्या सरदार आणि जहागीरदार घराण्यांनी हिंदवी स्वराज्याचं रक्षण केलं, त्याच घराण्यातील लोक रस्त्यावर उतरलेलं पाहायला मिळालं.
महाराणी ताराबाईंच्या पुतळ्याजवळ भगवा ध्वज फडकावून शहरात रॅली काढण्यात आली. त्यानंतर दसरा चौकात आरक्षणाच्या मागणीसाठी ठाण मांडून बसलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी पाठिंबाही दिला. या आंदोलनात घोरपडे, चव्हाण, गायकवाड, शिंदे, खानविलकर यांच्यासह विविध राजघराण्यांतील मंडळीनी सहभाग नोंदवला.
कोल्हापूरातील इतिहास प्रसिद्ध घराणी
सेनापती घोरपडे
संताजी घोरपडेयांचे वंशज
हिम्मत बहाद्दर चव्हाण घराणे
रामचंद्र बावडेकर, घराणे
पंतप्रतिनिधी विशाळगडकर घराणे
नेसरीकर शिंदे घराणे
डफळे घराणे
गायकवाड घराणे
निंबाळकर सरनोबत घराणे
इंगळे घराणे
खानविलकर घराणे
शिंदे खोरगिलकर घराणे
सरलष्कर बहाद्दर घराणे
घाडगे सरकार घराणे
सर्वांची संमती, मग मराठा आरक्षण अडलंय कुठं?: उदयनराजे
मराठा आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही तर मग इतकी वर्ष हा प्रश्न का सुटला नाही? 58 मूक मोर्चे निघाले पण तरीही मराठा आरक्षण लांबवलं. त्याचवेळी तातडीने पावलं उचलली असती, तर आज अनेकांचे जीव गेले नसते, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दुसऱ्या कोणत्या समाजाचं आरक्षण काढून घ्या असं आम्ही म्हणत नाही. मात्र मराठा, धनगर समाजातील जनतेलाही न्याय मिळावा, असं उदयनराजे म्हणाले.
मराठा आरक्षण परिषद या नावाखाली सर्वांना एकत्र करु. सर्वांचे विचार घेऊन आम्ही निर्णय घेऊ. मी नेता म्हणून, खासदार म्हणून नाही तर जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मी बांधील असेन, असं उदयनराजे म्हणाले.
मराठा आरक्षणाची सुनावणी 14 ऐवजी 7 ऑगस्टला, हायकोर्टाचा निर्णय मराठा आरक्षणासंदर्भातील मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी आता 14 ऐवजी 7 ऑगस्टला होणार आहे. हायकोर्टानेच हा निर्णय घेतला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यभरात वातावरण तापलं असून अनेक ठिकाणी तीव्र आंदोलनं सुरु आहेत. आतापर्यंत सात तरुणांनी आत्महत्या केल्याची माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी हायकोर्टाच्या निर्दशनास आणून दिली. तसंच ही सुनावणी लवकरात लवकर घेण्याची विनंती केली. त्यांची ही विनंती हायकोर्टाने मान्य केली. मुख्यमंत्र्यांची मान्यवरांसोबत बैठक मराठा आरक्षणासंदर्भात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. या बैठकीत मराठा समाजाच्या लघु आणि दीर्घ उपाययोजनावर चर्चा झाली. आंदोलनात हिंसा होऊ नये यासाठी दोन्ही बाजूनी आवाहन करण्यात आलं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितलं. मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. श्रीमंत शाहू महाराज अनुपस्थित मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणपश्नी बोलावलेल्या बैठकीला जाण्यास कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी नकार दिला. आरक्षणावर तोडगा काढणासाठी मुख्यमंत्र्यांकडून कोल्हापूरच्या शाहू महाराजांसह इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, प्रतापसिंह जाधव यांना निमंत्रण देण्यात आलं. मात्र मराठा आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर या तिघांनीही बैठकीस जाण्यास नकार दिला. 58 मराठा मोर्चे काढूनही मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाच्या भावना कळाल्या नाहीत, अशा बैठकीत जाऊन आम्ही काय वेगळं सांगणार, असं म्हणत शाहू महाराजांनी सरकारला लक्ष्यं केलं. संबंधित बातम्या मान्यवरांची बैठक संपली, आरक्षणासाठी कटिबद्ध: मुख्यमंत्री हातकणंगलेत आंदोलक महिलांनी शिवसेना आमदाराला बांगड्या दाखवल्या मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीस श्रीमंत शाहू महाराजांचा नकारअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement