Kolhapur rape : गर्भवती महिलेवर पाच जणांकडून वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार, कोल्हापुरात धक्कादायक प्रकार उघड
आसाममधील एका गर्भवती महिलेचे अपहरण करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आसाम, राजस्थानसह कोल्हापूरमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी कोल्हापूरच्या करवीर पोलीस ठाण्यात चार संशयित विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कोल्हापूर : आसाममधील एका गर्भवती महिलेचे अपहरण करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आसाम, राजस्थानसह कोल्हापूरमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी कोल्हापूरच्या करवीर पोलीस ठाण्यात चार संशयित विरोधात गुन्हा दाखल केला असून यामध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे. राम करण योगी, दिलीप योगी अशी संशयितांची नावे असून यात परप्रांतीय महिलांचाही समावेश आहे.
पीडित महिला ही आसाम मधील असून तिला एक मुलगी देखील आहे. आणि आता ती गर्भवती आहे. अशावेळी सप्टेंबर 2020 मध्ये संशयितांनी तिला आसाममधील ओळखीच्या ठिकाणी बोलावून घेतले. गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. पीडित महिला बेशुद्ध झाल्यानंतर संशयितांनी तिला आसाममधील एका ठिकाणी नेले. त्या ठिकाणी तिच्या मुलीला ठार करण्याची धमकी दिली.शिवाय संशयित रामकरण याने लग्न करण्यास भाग पाडले. त्यानंतर पीडित महिलेला राज्यस्थानमध्ये आणून काही दिवस ठेवण्यात आले. तर सर्व संशयित काही महिन्यांपूर्वी पीडित महिलेला घेऊन कोल्हापुरात आले.
धावत्या ट्रॅव्हल्समध्ये क्लिनरकडून तरुणीवर बलात्कार, गाडीतून फेकून देण्याची धमकी, वाशिममधील घटना
कोल्हापुरात एका भाड्याच्या खोलीमध्ये संशयितांनी पीडित महिलेला डांबून ठेवले होते. दरम्यान पीडित महिला गर्भवती असल्याचे माहित असताना देखील रामकरण आणि दिलीप याने पीडितेवर अत्याचार केला. संबंधित महिलेने विरोध केला असता 'आम्ही तुला विकत घेतले आहे' असे सांगत संशयित महिलेला मारहाण करत असत. या दोघांसह अन्य तिघांनी देखील पीडित महिलेवर अत्याचार केले. शेजारी असणाऱ्या महिलेच्या मदतीने पीडितेने करवीर पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. त्यानुसार चार संशयित विरोधात गुन्हा दाखल केला असून एकाला करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.