एक्स्प्लोर
कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचं वेळापत्रक जाहीर
कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा येत्या 24 डिसेंबरपासून होणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.
कोल्हापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उडाण योजनेअतंर्गत सुरु होणाऱ्या विमानसेवेमध्ये कोल्हापूर-मुंबई या विमानसेवेचाही समावेश आहे. ही विमानसेवा येत्या 24 डिसेंबरपासून होणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.
संभाजीराजे यांनी ट्विटरवरुन या विमानसेवेचं वेळापत्रकही शेअर केलं आहे.
संभाजीराजेंनी दिलेल्या माहितीनुसार,
- कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा २४ डिसेंबरपासून सुरु होईल.
- दर मंगळवार, बुधवार, रविवार अशी ही विमानसेवा असेल
- मुंबई ते कोल्हापूर दुपारी १:१५ वाजता विमान असेल, ते दुपारी 2.30 वा. कोल्हापूरला पोहोचेल.
- त्याच दिवशी कोल्हापूर ते मुंबई दुपारी ३:२५ वाजता : मुंबईकडे निघेल, मग ते विमान दुपारी ४:४० वाजता मुंबईत पोहोचेल.
- नांदेड- मुंबई – (जून- 2017)
- नांदेड – हैदराबाद- (जून- 2017)
- नाशिक (ओझर) – मुंबई (सप्टेंबर- 2017)
- नाशिक (ओझर) – पुणे (सप्टेंबर- 2017)
- कोल्हापूर – मुंबई (सप्टेंबर- 2017)
- जळगाव -मुंबई (सप्टेंबर- 2017)
- सोलापूर – मुंबई (सप्टेंबर- 2017)
स्वस्त 'उडाण', हवाई प्रवास अडीच हजारात
कोल्हापूर - मुंबई विमानसेवा येत्या 10 दिवसात! कोल्हापूर ते मुंबई विमानसेवेला केंद्राचा हिरवा कंदीलअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement