एक्स्प्लोर
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणारी तरुणीही अल्पवयीन
कोल्हापुरातील ताराबाई पार्क परिसरातल्या एका आलिशान अपार्टमेंटमध्ये आरोपी तरुणी आई-वडिलांसोबत राहते.

कोल्हापूर : गेल्या सहा वर्षांपासून एका अल्पवयीन तरुणावर लैंगिक अत्याचार करणारी पोलिस अधिकाऱ्याची मुलगीही अल्पवयीन असल्याचं समोर आलं आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस ठाण्यात तरुणाच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. धक्कादायक म्हणजे तरुणाच्या गुप्तांगाला आरोपी तरुणीने लायटरने चटके दिल्याचं समोर आलं आहे. कोल्हापुरातील ताराबाई पार्क परिसरातल्या एका आलिशान अपार्टमेंटमध्ये आरोपी तरुणी आई-वडिलांसोबत राहते. 2012 साली संबंधित अल्पवयीन मुलगा कचरा गोळा करण्यासाठी तिथे आला होता. त्यावेळी दोघांची ओळख झाली. त्यानंतर या मुलाला दत्तक घेतल्याची माहिती आहे.
अल्पवयीन तरुणाचं लैंगिक शोषण, तरुणीविरोधात गुन्हा
या तरुणावर आरोपी तरुणीने लैंगिक अत्याचार केले, त्याच्या पाठीवर आणि गुप्तांगावर लायटरनं चटके दिल्याचाही आरोप आहे. मुलाच्या आईच्या तक्रारीनंतर चाईल्डलाईननं मुलाची सुटका केली. या प्रकरणानंतर आईची तक्रारही पोलिस नोंदवून घेत नव्हते, शेवटी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि अल्पवयीन तरुणीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.आणखी वाचा























