एक्स्प्लोर
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील खासगी अभिषेक बंद
कोल्हापुरातील अंबाबाईच्या गरुड मंडपात देवस्थान समितीची परवानगी नसतानाही भक्तांकडून मनसोक्त रक्कम खाजगी पुजारी दक्षिणा म्हणून स्वीकारत होते. त्यामुळे खाजगी पुजाऱ्यांकडून होणाऱ्या अभिषेकाला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
मुंबई : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी. मंदिरातील गरुड मंडपात होणारे खासगी अभिषेक आजपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता केवळ देवस्थान समिती आणि हक्कदार पुजार्यांकडूनच गरुड मंडपात अभिषेक होतील. या निर्णयामुळे देशभरातून येणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणात होणारी लुबाडणूक थांबणार आहे.
गेली कित्येक वर्ष कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपात खाजगी पुजारी हे भक्तांकडून वारेमाप पैसे घेऊन अभिषेक घालत होते. या मंडपात देवस्थान समितीची परवानगी नसतानाही इथे भक्तांकडून मनाला येईल तेवढी रक्कम खाजगी पुजारी दक्षिणा म्हणून स्वीकारत होते. याच कारणामुळे खाजगी पुजाऱ्यांकडून गरुड मंडपात होणाऱ्या अभिषेकाला बंदी घालण्यात आली आहे. या उलट आजपासून मंदिरात देवस्थान समितीचे पुजारी आणि पारंपरिक हक्कदार पुजारीच अभिषेक घालतील, असा निर्णय काल पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतल्याचं सांगण्यात आलं आहे.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे राज ठाकरेंच्या भेटीला | मुंबई
देवस्थान समितीकडून होणारे अभिषेक 250 रुपयांपासून 800 रुपयांपर्यंत केले जातात. मात्र स्वयंघोषित पुजार्यांकडून अभिषेक आणि पाद्यपूजेसाठी 2,500 ते 5,000 रुपयांपर्यंत रक्कम आकारली जात होती. भाविकांचा हा त्रास कमी करण्यासाठी देवस्थान समितीने असे खासगी अभिषेक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाचं भक्तांकडून जोरदार स्वागत करण्यात येत आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य भाविकाची लूटमार बंद होऊन सर्वसामान्य भाविकालाही अभिषेक घालण्यास मिळेल. परिणामी भाविकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
बॉलीवूड
Advertisement