धक्कादायक! भाऊबीजेच्या तोंडावर भावा-बहिणीवर काळाचा घाला, आयशर टेम्पोच्या धडकेत कोल्हापुरात तिघांचा मृत्यू
ऐन दिवाळी सणात आणि भाऊबीजेच्या दोन दिवस आधीच कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील तरसंबळेच्या भावा- बहिणींवर काळाने आघात केला आहे.
Kolhapur Accident News : ऐन दिवाळी सणात आणि भाऊबीजेच्या दोन दिवस आधीच कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील तरसंबळेच्या भावा- बहिणींवर काळाने आघात केला आहे. कोल्हापूर राधानगरी रोडवरील कौलव गावाजवळ आयशर टेम्पो आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिवाळीच्या सणात भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
दिवाळीच्या सणात भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. या हृदयद्रावक घटनेने तरसंबळे गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 10 वर्षीय मुलावर कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अथर्वची मृत्यूशी झुंज सुरू आहे. काळीज पिळवटून टाकणाऱ्या या अपघाताने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
कोल्हापूर- राधानगरी रोडवरील कौलव गावाजवळ बुवाचा वडा
आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरकडे निघालेल्या भरधाव आयशर टेम्पोने मोटरसायकलला समोरासमोर जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. श्रीकांत कांबळे, वय 30 रा. तरसंबळे, दीपाली गुरुनाथ कांबळे 28 रा. शेंडूर ता. कागल या सख्ख्या बहिण भावासह 3 वर्षीय शिवद्या सचिन कांबळेचा दुर्दैवी मृत्यू झालाआहे. तर अथर्व गुरूनाथ कांबळे या गंभीर जखमी झालेल्या 10 वर्षीय मुलावर सीपीआर मधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
एका मुलीच्या छेडछाडनंतर डाचकुल पाडा परिसरात दोन गटांमध्ये झटापट, 25 पेक्षा जास्त रिक्षांची तोडफोड
मीरा-भाईंदरमधील काशीमिरा परिसरातील डाचकुल पाडा येथे काल रात्री दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाल्यानंतर आज सकाळी काही जणांकडून मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ऑटो रिक्षांच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच काशिमीरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार काही व्यक्ती हातात दांडके, लोखंडी सळया आणि दगड घेऊन आले होते व त्यांनी रिक्षांच्या काचा फोडल्या. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन उपद्रव माजविणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेची माहिती मिळताच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घटनास्थळी पोहचून स्वतः नागरिकांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती घेतली व दोषींवर कारवाई करण्यासाठी सांगितले. तसेच या परिसरात अमली पदार्थ विक्री होते त्यावर सुद्धा कारवाई करण्याचे निर्देश दिले.सध्या पोलिसांनी डाचकुल पाडा परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Parbhani Accident : मुंबईतील निवासी उपजिल्हाधिकाऱ्याच्या वाहनाची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, एक जण जखमी






















