एक्स्प्लोर

मरण कवटाळणे भाग पडलेल्यांसाठी सहवेदना, किसानपुत्रांचं आज अन्नत्याग आंदोलन

शेतकरी आत्महत्यांकडे समाजाचे आणि सरकारचे लक्ष वेधले जावे म्हणून महाराष्ट्रातील तसेच देशातील आणि विदेशातील लाखो शेतकरी, किसानपुत्र आज 19 मार्च रोजी एक दिवस अन्नत्याग-उपवास करणार आहे. काय आहे, कसे आहे हे आगळेवेगळे आंदोलन? 

मुंबई : आज 19 मार्च रोजी महाराष्ट्रातील शेतकरी व किसानपुत्र हे आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. किसानपुत्र आंदोलनाच्या आवाहानानुसार संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशातील काही राज्यात आणि जगातील काही देशात अन्नदात्यासाठी अन्नत्याग म्हणजे एक दिवसाचा उपवास करण्यात येणार आहे. 19 मार्च 1986 रोजी चिलगव्हाण (यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी पूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली होती. या आत्महत्येचा हा 35 वा स्मृतीदिन आहे.

19 मार्च का?
19 मार्च 1986 रोजी चिलगव्हाण (ता.महागाव, जि. यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी पत्नी व चार मुलांसह आत्महत्या केली होती. ही शेतकऱ्याची पहिली सामूहिक आत्महत्या मानली जाते. 2017 पासून मरण कवटाळणे भाग पडलेल्या शेतकऱ्यांसाठी सहवेदना म्हणून महाराष्ट्रातीलच नव्हे, देशातील व विदेशातील लाखो सुहृदयी लोक दरवर्षी 19 मार्चला उपवास करतात.

सहवेदना
अन्न हा जीवाचा मूलाधार आहे. अन्न निर्माण करता आले म्हणून माणूस प्रगती करू शकला. शेतकरी अन्न पिकवतो. तो सर्जक आहे. त्याच्या आत्महत्या ही गंभीर बाब आहे. खरे तर शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती मानली पाहिजे. दुर्दैवाने या गंभीर बाबीकडे कोणाचे फारसे लक्ष नाही.शेतकरी आत्महत्या थांबाव्यात या साठी मी काय करू शकतो? आपण सामान्य माणसे आहोत. आपल्या हातात सत्ता नाही. शेतकरीविरोधी (सीलिंग, आवश्यक वस्तू आदी) नरभक्षी कायदे रद्द करण्याचा अधिकार नाही. आपण शस्त्र घेऊन लढू शकत नाही. करोडो शेतकाऱ्याना आर्थिक मदत देण्याऐवढी पुंजीही आपल्या जवळ नाही. आपण सामान्य माणसे, सहवेदना व्यक्त करू शकतो. शेतकाऱ्याना 'आम्ही तुमच्या पाठीशी आहोत' हा दिलासा देऊ शकतो. तो दिलासा देण्यासाठी व सहवेदना व्यक्त करण्यासाठी 19 मार्च रोजी आपल्याला उपवास करायचा आहे. आत्मक्लेशाचा हा मार्ग या देशात अनेकदा वापरला गेला आहे. त्यातून अपेक्षित परिणाम आले आहेत. तोच प्रयत्न आपण करायचा आहे!

उपवास आणि उपोषण?
हा उपवास उत्स्फूर्तपणे, आपल्या मनाशी निर्धार करून करायचा आहे.
आपण आपले नित्याचे काम करीत उपवास करु शकतो. खूप केले देवा-नवसाची उपवास, आता एक उपवास शेतकऱयांसाठी! याला आपण वैयक्तिक उपवास म्हणू.
सार्वजनिक ठिकाणी बसणे, म्हणजे उपोषण करणे, तुम्हाला जे सोयीचे वाटेल त्या पद्धतीने उपवास किंवा उपोषण करू शकता.

अन्नत्याग का?
१) साहेबराव करपे कुटुंबीय व आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांचे स्मरण करणे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे.
२) शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करणे.
३) शेतकऱ्यांप्रती आपली बांधीलकी बळकट करणे.
४) शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी कारणीभूत असलेल्या कारणांचा विचार करून विरोध करणे.
५) शेतकरी स्वातंत्र्यासाठी संकल्प करणे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra live blog updates: मुंबईतील सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ
Maharashtra live blog updates: मुंबईतील सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार; पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ
Mumbai BMC Tabs: मुंबई महापालिकेतील 237 नगरसेवकांना टॅब देण्याच्या भाजपच्या योजनेला ब्रेक; 'मेड इन चायना' टॅबलेटचा GeM खरेदी प्रक्रियेत अडथळा
मुंबई महापालिकेतील 237 नगरसेवकांना टॅब देण्याच्या भाजपच्या योजनेला ब्रेक; 'मेड इन चायना' टॅबलेटचा GeM खरेदी प्रक्रियेत अडथळा
Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
चंद्रशेखर बावनकुळेंना भाजपने महत्त्वाची जबाबदारी सोपवली, थेट राष्ट्रीय पातळीवर नियुक्ती
Tukaram Mundhe FDA action on Pan Masala: तुकाराम मुंढेंचा मोर्चा बाॅलिवुडच्या स्टार मंडळींकडे, थेट शाहरुख, अजय देवगण रडारवर! नोटीस सुद्धा धाडली, नेमकं घडलं तरी काय?
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बाॅलिवुडच्या स्टार मंडळींकडे, थेट शाहरुख, अजय देवगण रडारवर! नोटीस सुद्धा धाडली, नेमकं घडलं तरी काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Embed widget