Shiv Sena vs BJP LIVE : पुन्हा सोमय्या वि. शिवसेना? भाजप नेते किरीट सोमय्यांचा आज कोर्लई दौरा

Shiv Sena vs BJP LIVE : भाजप नेते किरीट सोमय्या आज कोर्लई दौरा. कोर्लईच्या बंगल्यांबाबत ठाकरे कुटुंबीयांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी तर संजय राऊतांचा सोमय्यांवर पुन्हा हल्लाबोल

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Feb 2022 02:40 PM
Kirit Somaiya Daura : कोलई ग्रामपंचायतीत शिंपडलं गोमूत्र

Kirit Somaiya Daura : कोर्लई येथील जमीन घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्या यांनी तेथील ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. त्यावेळेस किरीट सोमय्या यांच्या सोबत आलेल्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले. यावेळेस, शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करून ग्रामपंचायत कार्यालयात गोमूत्र शिंपडलं.

ग्रामपंचायत, सरपंच मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी आहेत का? : किरीट सोमय्या

नारायण राणे यांच्या टीकेला विनायक राऊतांकडून चोख उत्तर : संजय राऊत

आमचा केवळ शिवसेनेच्या विस्तारावर डोळा, बाकी कशावर नाही असं म्हणत संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्या टीकेला विनायक राऊत यांनी चोख उत्तर दिलं, असंही म्हटले आहेत.

Narayan Rane: संजय राऊतांची कुंडली माझ्याकडे, वेळ आल्यानंतर बाहेर काढेन: नारायण राणे

संजय राऊतांनी शिवसेना संपवण्यासाठी राष्ट्रवादीची सुपारी घेतल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. राऊतांनी आरोप केले पण पुरावे का नाही दिले असा सवालही त्यांनी केला. संजय राऊतांना कसली भिती वाटते. संजय राऊतांची कुंडली माझ्याकडे, वेळ आल्यानंतर ती बाहेर काढेन असंही ते म्हणाले. 

संजय राऊतांना घाम का फुटला होता; नारायण राणेंचा राऊतांना टोला

राऊत सांगतात मी कुणाला घाबरत नाही, मग त्यांना घाम का फुटला होता असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विचारला आहे. काल आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आपण पाहिली असाही त्यांनी टोला हाणला. 

Kirit Somaiya PC : ठाकरेंचे बंगले नाहीत तर घरपट्टी कशाला भरता? मला नाही, मुख्यमंत्र्यांना घेऊन जा

Kirit Somaiya PC : 'रश्मी ठाकरेंनी 19 बंगल्यांचा Property Tax भरला,' सोमय्यांनी सादर केली पावती

Kirit Somaiya PC : Sanjay Raut यांना उध्दव ठाकरेंवर खुन्नस काढायची आसेल तर सोमय्यांंचा उपयोग का?

संजय राऊत ईडी चौकशीसाठी का गेले नाही? सोमय्यांचा सवाल

ठाकरे कुटुंबीयांचे अलिबागमध्ये 19 बंगले असल्याचं सिद्ध करण्याचं संजय राऊतांचं आव्हान, किरीट सोमय्यांचं प्रत्युत्तर

Kirit Somaiya Press : अलिबागमधील 19 घरांचा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला : किरीट सोमय्या

Kirit Somaiya Press : अलिबागमधील 19 घरांचा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. तसेच मनिषा रविंद्र वायकर यांनी देखील त्याचा टॅक्स भरला आहे. बंगले जर ठाकरेंच्या नावे नाहीत तर टॅक्स भरता कशाला? असा सवाल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. काल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला आज किरीट सोमय्या यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी अलिबागमधील 19 बंगले ठाकरे यांचेच असल्याचे सांगितले. बंगल्याचा टॅक्स रश्मी ठाकरे यांनी भरला, त्यामुळे संजय राऊत आता जोड्यानं कुणाला मारणार? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 





Kirit Somaiya Press Conference LIVE : संजय राऊतांचं आव्हान, किरीट सोमय्यांचं प्रत्युत्तर

पार्श्वभूमी

Kirit Somaiya : 'उद्धवजी फक्त जनतेला सांगा, मुख्यमंत्री असताना माझ्या बायकोचे बंगले चोरीला गेले' : किरीट सोमय्या


BJP Leader Kirit Somaiya will be visiting Korlai in Alibag : 19 बंगल्यांवरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे परिवारावर आरोप सुरुच ठेवले आहेत. आज ते कोर्लई गावाला भेट देणार आहेत. त्याआधी बोलताना सोमय्या यांनी म्हटलं आहे की, गेल्या 17 महिन्यांपासून मी या विषयाचा पाठपुरावा करत आहोत. मला त्या ग्रामपंचायतीनंच माहिती दिली आहे. त्यांनी जी कागदं दिली आहेत त्यावरुनच आम्ही बोलत आहोत. आम्हाला वास्तविकता काय झालं हे समजून घ्यायचं आहे. काय झालंय हे आम्हाला मुख्यमंत्र्यांनीच सांगावं. ते खोटं बोलू शकत नाहीत. मुख्यमंत्री साहेब चुका होतात.  फक्त जनतेला सांगा की मुख्यमंत्री असताना माझ्या बायकोचे बंगले चोरीला गेले मी सांभाळू नाही शकलो, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. 


परवानगी नाही दिली तर निवेदन देणार 


किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे की, प्रशासनानं आम्हाला अडवलं तर आम्ही काहीही विरोध करणार नाहीत पण कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते अडवत असतील तर मात्र काय होईल हे सांगू शकत नाही. 19 बंगले ठाकरे आणि वायकर परिवाराचे आहेत. जर हे बंगले त्यांचे असतील तर ते त्यांच्या संपत्तीमध्ये का दाखवण्यात आले नाहीत. मला कोर्लईमध्ये आधीही गेलो होतो त्यावेळीही तिथल्या सरपंचांनी विरोध केला होता. हे खरं आहे की नाही याचं स्पष्टीकरण ठाकरे परिवारानं द्यायचं आहे. घरं चोरीला गेली की गायब झाली हे ठाकरे परिवारानं सांगायचं आहे. जनतेला त्यांनी सत्य सांगावं, असं त्यांनी म्हटलं आहे.


वास्तविकता लोकांना जाणून घ्यायची आहे


किरीट सोमय्या म्हणाले की,  घरे आहेत की नाही ही वास्तविकता लोकांना जाणून घ्यायची आहे.  ही घरे चोरीला गेली की वाहून गेली हे जनतेला जाणून घ्यायचे आहे.  जानेवारी 2019 मध्ये ठाकरे सरकारने पत्र दिले.  रश्मी उद्धव ठाकरे आणि मनिषा रवींद्र वायकर यांच्या नावाने घरे करावी असे पत्र दिले.  12 नोव्हेंबर 2020ला आर्टिजीएसने खात्यात पैसे ट्रान्सफर झाले  सप्टेंबर 2020 पासून मी पाठपुरावा करत आहे.  ग्रामपंचायत कार्यालयात जी कागदं दिली आहेत त्याचा एकदाही उद्धव ठाकरे यांनी इन्कार केलेला नाही, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे. 


सोमय्या म्हणाले की, अमरावती, कोल्हापूर आणि पुण्यात तर 100 गुंड आले होते तरी सोमय्या उभा आहे.  आम्ही कुणीही आज दंगल करणार नाही.  प्रशासन बोलले तुम्ही पुढे जाऊ शकत नाही तर मी त्यांच्या हातात पत्र देऊन येणार असं ते म्हणाले. 


संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'सोमय्या देशातील सर्वात मोठा चोर, भाजपला भुतानं झपाटलंय'


Sanjay Raut on Kirit Somaiya : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आज पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. भाजपचे लोकं मराठी माणसांना संपवू पाहत आहेत. हे सगळे अन्वय नाईकांचे हत्यारे आहेत. आणि आता तेच त्या जमिनीवर जात आहेत, असं राऊत म्हणाले. त्यांना कुठं जायचं तिथं जाऊ द्या, ते काय नेल्सन मंडेला आहेत का? ते काय क्रांतीकारी आहेत काय? ते चोर आणि लफंगा आहेत, सोमय्या देशातील सर्वात मोठा चोर आहेत, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकेरी भाषेत म्हटलं आहे. आता त्यांच्या विरोधात खंडणीचे गुन्हेही दाखल होणार आहेत. आता पाहत राहा, त्यांचा खेळ खल्लास झालाय. ते जे पळत आहेत ते जेलच्या दिशेने पळत आहेत, हे बापलेक नक्की जेलमध्ये जाणार आहेत, असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.