अहमदनगरमध्ये अवतरला उत्तर कोरियाचा हुकूमशाह, 'हा' दिसतो हुबेहुब किम जोंग उनसारखा
अहमदनगर : जगात एकाच चेहर्याचे 'सात' मिळते-जुळते चेहरे असतात असं म्हणतात आणि याचीच अनुभूती तुम्हाला सोनईच्या अभिषेक बारहाते (Abhishek Barhate) याला पहिल्यावर होईल.
![अहमदनगरमध्ये अवतरला उत्तर कोरियाचा हुकूमशाह, 'हा' दिसतो हुबेहुब किम जोंग उनसारखा kim jong un duplicate in maharashtra ahmednagar residene Abhishek borhate looks same as kim jong अहमदनगरमध्ये अवतरला उत्तर कोरियाचा हुकूमशाह, 'हा' दिसतो हुबेहुब किम जोंग उनसारखा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/21/cd7315f831f6ae32930418b319987310_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अहमदनगर : उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशाह किम जोंग उन (Kim Jong Un) याच्या मनमानी कारभार, त्याची दहशत अवघ्या जगाला माहित आहे. त्याच्या देशातील नागरिकांवर लादणारे विचित्र निर्बंध असो वा शिक्षा किम जोंगचा मनमानी कारभार पाहायला मिळतो. मग ते अगदी अमेरिकेला धमकी असो किंवा त्याच्या देशात हसण्यावर आणि उत्सव साजरे करण्यावर बंदी घालणे असो. पण एकीकडे स्वतःच्या देशात हसण्यावर बंदी घालणारा किम जोंग उन आहे तर दुसरीकडे असा एक किम जोंग उन जो महाराष्ट्राला हसवणार आहे. हे आहेत अहमदनगर जिल्ह्यातील सोनईचे अभिषेक बारहाते (Abhishek Barhate). हुबेहूब किम जोंग उन सारखा दिसणारे अभिषेक बारहाते सध्या अहमदनगर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. कारण अभिषेक उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन याच्यासारखाच दिसतो. अभिषेकला 'सोनईचा भाऊ कदम' देखील म्हणतात.
अभिषेक बारहाते पेशान अभिनेते आहे आणि तो हुबेहूब किम जोंग उन याच्यासारखाच दिसतो. त्यांचे कपडे त्याची हेअर स्टाईल ही अगदी किम जोंग उनप्रमाणेच आहे. एकाला झाकावे दुसऱ्याला पाहावे अगदी तसाच हुबेहूब अभिषेक दिसतो. अभिषेक पुन्हा छोट्या पडद्यावर 'वर्हाड निघालं अमेरिकेला' या नव्या पर्वात झळकणार आहे आणि अर्थातच तो पुन्हा किम जोंगच्या भूमिकेत सर्वांना हसवणार आहे.
एका मराठी वाहिनीवरील कार्यक्रमातून 2018 मध्ये अभिषेकने आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता. त्यावरच किम जोंग उन हे पात्र अभिषेकने छोट्या पडद्यावर साकारलं. त्यातच नगरी भाषेचा विनोदी पद्धतीने केलेला वापरामुळे हा नगरी किम जोंग महाराष्ट्रात व्हायरल झाला. त्याच्या यशाबद्दल त्याच्या मित्रांनी समाधान व्यक्त केलंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- China Artificial Moon : सूर्यानंतर आता चंद्र देखील मेड इन चायना; चीननं तयार केला कृत्रिम चंद्र
- Paracetamol Uses : सावधान! 'या' पेयांसोबत पॅरासिटामोलची गोळी कधीही खाऊ नका, होईल वाईट परिणाम
- Pigmentation Remedies : कच्च्या दुधाचा असा करा वापर सुरकुत्या होतील दूर आणि त्वचा होईल मुलायम
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)