एक्स्प्लोर

Karuna Sharma | करुणा शर्मा यांना अखेर जामीन मंजूर! तब्बल 16 दिवसानंतर सुटका

करुणा शर्मा यांना अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. करुणा शर्मा यांना तब्बल 16 दिवस न्यायालयीन कोठडीत काढावे लागले आहे.

बीड : कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी परळीत आलेल्या आणि त्यानंतर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झालेल्या करुणा शर्मा यांना अंबाजोगाईच्या सत्र न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. करुणा शर्मा यांना तब्बल 16 दिवस न्यायालयीन कोठडीत काढावे लागले आहे.

करुणा शर्मा यांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे आल्यानंतर एका महिलेला जातिवाचक शिविगाळ केली आणि प्राणघातक हल्ला केला म्हणून करुणा शर्मा यांच्यासह त्यांचा सहकारी अरुण मोरेंवर गुन्हा दाखल झाला होता. परळी पोलिसांनी 5 सप्टेंबर रोजी अटक केली होती. तर 6 सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यावरची सुनावणी पुढे ढकलली जात होती. दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. अखेर आज न्यायालयाने करुणा शर्मांना जामिन मंजूर केला.

करुणा शर्मांना कोर्टात हजर करणार, अॅट्रोसिटी आणि गाडीत पिस्तुल सापडल्याचा गुन्हा, करुणा यांचीही फिर्याद

काय आहे प्रकरण?
मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेल्या करुणा शर्मा यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशाखा रविकांत घाडगे यांनी करुणा शर्मा यांच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार कलम 307 आणि अॅट्रोसिटी कायद्याखाली हा करुणा शर्मा आणि अरुण दत्ता मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परळीमध्ये करुणा शर्मा दाखल झाल्यानंतर काल वैद्यनाथ मंदिरासमोर पायरीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना जमावाने त्यांना अडवलं व घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता.

न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर करुणा शर्मा यांनी लगेच जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, करुणा शर्मा यांनी जामीन अर्जावर सही केली नव्हती. माझा वकील आल्या शिवाय जामीन अर्ज करणार नाही, असं करुणा शर्मा यांनी म्हटलं होतं. आपण हा गुन्हा केला नसल्याचं करुणा शर्मा यांनी कोर्टासमक्ष सांगितलं होतं. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

घटनाक्रम :

  • 4 सप्टेंबर - करुणा शर्मा बीडमध्ये दाखल
  • 5 सप्टेंबर - करुणा शर्मा परळीत, दिवसभर नाट्यमय घडामोडी, गुन्हा दाखल
  • 6 सप्टेंबर - अंबाजोगाई सत्र न्यायालयासमोर हजर; करुणा शर्मा यांना न्यायालयीन कोठडी तर अरुण मोरे यास पोलीस कोठडी
  • 7 सप्टेंबर - अरुण मोरेची न्यायालयीन कोठडीत रवानगी
  • 8 सप्टेंबर - करुणा शर्मांचा जामिनासाठी न्यायालयात अर्ज, सुनावणीसाठी १४ सप्टेंबर तारीख
  • 14 सप्टेंबर - न्यायाधीश रजेवर, जामीन अर्जावरील सुनावणी १८ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली
  • 18 सप्टेंबर - न्यायालयासमोर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद
  • 20 सप्टेंबर - न्यायालयासमोर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण
  • 21 सप्टेंबर - करुणा शर्मा यांना सशर्त जामीन मंजूर

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवारांना विकासाचा फोबिया का झालाय? जिथे विकासकामे सुरु तिथं आंदोलन करतायेत, गोरेंचा हल्लाबोल, म्हणाले आंदोलनाआधी आजोबांचा सल्ला घ्यावा
रोहित पवारांना विकासाचा फोबिया का झालाय? जिथे विकासकामे सुरु तिथं आंदोलन करतायेत, गोरेंचा हल्लाबोल, म्हणाले आंदोलनाआधी आजोबांचा सल्ला घ्यावा
Food Safety Diwali Guidelines : सणासुदीत मिठाई खरेदी करताना काय करावं? दूध, खवा चॉकलेट पदार्थांची भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंनी दिला ग्राहकांना कानमंत्र
सणासुदीत मिठाई खरेदी करताना काय करावं? दूध, खवा चॉकलेट पदार्थांची भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंनी दिला ग्राहकांना कानमंत्र
राहुल गांधींच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय कट, त्यांच्याकडून संविधानाला टार्गेट, मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप, म्हणाले, लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही मैदानात 
राहुल गांधींच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय कट, त्यांच्याकडून संविधानाला टार्गेट, मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप, म्हणाले, लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही मैदानात 
जनतेची ताकद दाखवू आणि लोकशाहीसह गोकुळही वाचवू, गोकुळच्या मैदानात रोहित पवारांची एन्ट्री, मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन
जनतेची ताकद दाखवू आणि लोकशाहीसह गोकुळही वाचवू, गोकुळच्या मैदानात रोहित पवारांची एन्ट्री, मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Cristiano Ronaldo Retirement : क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, व्हिडिओ जारी करत थेट निर्णय सांगितला...
क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर पण एक स्वप्न अधुरं राहिलं...
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
Embed widget