एक्स्प्लोर
Advertisement
कन्यागत महापर्वासाठी नृसिंहवाडी सज्ज
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये 12 ऑगस्टपासून महापर्वकाळ सुरु होतो आहे. या कालावधीत महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमधून लाखोंच्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येणार आहेत. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली.
दर 12 वर्षांनी हा कन्यागत महापर्व काळ सोहळा नृसिंहवाडीत साजरा होतो. नाशिकच्या कुंभमेळ्या प्रमाणेच या मेळाव्याला लाखो भाविक उपस्थिती राहतात. गुरु कन्या राशीत प्रवेश करून कृष्णा नदीला गंगा नदी भेटायला येते, अशी आख्यायिका इथले पुजारी सांगतात.
हा सोहळा अनुभवण्यासाठी आणि कृष्णा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी भाविक नारासोबाच्या वाडीत दाखल होणार आहेत. या सोहळ्यासाठी सरकारी यंत्रणाही सज्ज झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
बीड
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement