वीज बिले कमी करण्याच्या नावाने नागरिकांची फसवणूक करणारा भामटा गजाआड
भरमसाठ आलेली वीजबिल कमी करण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न सुरु असतानाच एका भामट्याने याचा फायदा उचलला. या भामट्याने अनेक नागरिकांना बिल कमी करून देण्याचे आमिश दाखवून पैसे उकळले.
Kalyan latest news : कोरोना संकटाच्या काळात अनेक नागरिकांना अतिरिक्त वीज बिलाने शॉक दिला होता. नेहमीपेक्षा दुपट्ट- तिपट्ट पटीने वीज बिल आल्यामुळे सर्वसमान्यांचे आर्थिक गणित कोलमडले. हेच वीज बिल कमी करण्यासाठी आणि भरण्यासाठी नागरिकांनी महावितरण कार्यालयात एकच गर्दी केली होती. सर्वसामान्यांच्या याच अडचणीचा फायदा घेत एका भामट्याने खोटं आमिष दाखवत लुबाडले. भामट्याने भरमसाठ आलेली वीजबिल कमी आमिष दाखवत, पैसे उकळले. हा भामटा इतक्यावरच थांबला नाही, त्याने चक्क महावितरणला देखील बोगस चेक दिला. हा चेक बाऊन्स झाल्यानंतर या भामट्याचे बिंग फुटले. साहिल पटेल असे या भामट्याचे नाव आहे. कल्याणमधील महात्मा फुले पोलिसांनी या भामट्याला बेड्या ठोकल्या आहेत.
लॉकडाऊनमध्ये महावितरणकडून काही महिन्यांचे बिल घेतलं नाही. पण लॉकडाऊननंतर मात्र महावितरणने वीज बील आकारण्यास सुरुवात केली. या दरम्यान, नागरिकांना भरमसाठ बिले आली होती. एकीकडे लॉकडाऊन आणि दुसरीकडे भरमसाठ वीज बिल आल्याने नागरिक त्रस्त होते. वाढत्या बिलामुळे त्रस्त झालेले नागरिक बिल कमी करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात धाव घेत होते. बिल कमी करण्यासाठी तसेच भरण्यासाठी नागरिकांच्या लागलेल्या रांगा पाहून याच गर्दीत एक भामटा शिरला. हा तरूण काही लोकांना भेटला. कुणाचे 30 हजार, कुणाचे 40 हजार तर कुणाचे 50 हजार आलेले बिल कमी करून देतो असे आमिष दाखवून महावितरणमध्ये माझी ओळख आहे, असे सांगत जवळपास 23 जणांकडून या तरूणाने रक्कम घेतली. एवढेच नाही, तर महावितरणमध्ये बिल भरण्यासाठी त्याने स्वतःच्या खात्याचा वापर करत चेक दिला. मात्र, हा चेक बाऊन्स झाल्याने महावितरण अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासानंतर अशी बाब समोर आली की, या तरुणाने अनेक जणांना बिल कमी करून देण्याचे आमिष दाखवून लुबाडले आहे. या प्रकरणी मार्च 21 मध्ये कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. आता जानेवारी 2022 मध्ये पोलिसांना या भामट्याला अटक करण्यात यश आले. पोलीस या भामट्याची चौकशी करत आहेत. हा स्कॅम आहे का? यामध्ये आणखी कुणी सहभागी आहे का? याचा शोध तपास अधिकारी डी. एन. ढोले घेत आहेत.
हे ही वाचा :
- Mumbai Corona Update : मुंबईकरांना मोठा दिलासा! नव्या बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांची संख्या तिप्पट
- माझ्या वेळेच्या अनेकांना वाटायचं की, आपण क्रिकेटपटू व्हावं, पण संधी नव्हती : मुख्यमंत्री
- Mumbai Vaccination : मुंबईत लसीकरणामुळे मुलीचा मृत्यू, ही अफवा; महापौरांनी घेतली कुटुंबाची भेट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha