एक्स्प्लोर
इंदापूरची 'गीता फोगाट', वडिलांसोबत कुस्ती शिकणाऱ्या कोमल जाधवची संघर्षकथा
इंदापूर : अभिनेता आमीर खानच्या 'दंगल'ने गीता आणि बबिता फोगाटचा प्रवास समोर आणला. मात्र, अशीच एक 'गीता' महाराष्ट्राच्या मातीत अनेकांना धूळ चारते आहे. मर्दांच्या मैदानात मर्दांनाच धूळ चाळणारी ही आहे इंदापूरची मर्दानी कोमल जाधव. हरियाणाच्या मातीतल्या गीतानं जसं भारतासाठी कुस्तीतलं पहिलं सुवर्ण पदक जिंकलं. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा कोमलचा मनसुबा आहे. नाव कोमल असलं, तरी पोरांनाही धूळ चारण्यात ती पटाईत आहे.
वडील आणि मुलींची अनोख्या नात्याची रोमांचक, मन हळवं करणारी कथा दंगल सिनेमात मांडली आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आसलेला आणि आपल्या भूमिकांसाठी तेवढीच मेहनत घेणारा अभिनेता आमीर खान याचा दंगल सिनेमा रिलीज झाला आणि पुन्हा एकदा कुस्तीची चर्चा सुरु झाली.
हरियाणातील एका छोट्या गावात राहणाऱ्या महावीर फोगाट यांचा आणि त्यांच्या मुलींचा प्रवास दंगल सिनेमात मांडण्यात आला आहे. फोगट हे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील पदकविजेते आहेत.
फोगाट यांच्यासाराखचा संघर्ष पुण्यातील इंदापूरमधील दत्तात्रय जाधव यांचा आहे. ते मोठे कुस्तीगीर आहेत. जसा दंगल सिनेमातील फोगाट यांचा निर्धार, तसाच निर्धार दत्तात्रय जाधव यांचाही आहे. फरक फक्त एवढाच आहे की, सिनेमातील फोगाट यांना चार मूली, तर जाधव याना एक मुलगी आणि त्यानंतर मुलं आहेत.
पहिला मुलगा व्हावा असे दत्तात्रय यांना वाटत होतं. कारण तालीम करुन पैलवान बनवून भारतासाठी पदक आणण्याची त्यांची इच्छा होती. पण मुलगी झालीच. पण मूलगी झाली म्हणून ते निराश झाले नाहीत. मूलीलाच कुस्ती शिकवण्याची त्यांनी तयारी केली. समाज-संकृतीचा सामना त्यांनाही मोठ्या प्रमाणावर करावा लागला. मुलीच्या कुस्ती तालीमच्या दरम्यान सारखा घाम येत आसल्याने त्यांनी अनेक वेळा मुलीचे केस कापले होते.
विशेष म्हणजे मुलीला कुस्ती शिकवण्यास दत्तात्रय जाधव यांच्या पत्नीचाही विरोध होता. मात्र, त्यांनी मनाशी निर्धार केला होता. मुलीनंतर दत्तात्रय जाधव यांना दोन मुलं झाली. त्यांनी मुलांनाही कुस्ती शिकवायला सुरुवात केली. यासाठी त्यांनी स्वत:च्या सवयीनूसार मुलांनाही पाहटे उठून व्यायाम करण्यासाठी तयार केले. आजही तिन्ही मुलं पहाटे चार वाजता उठून पाच वाजता व्यायाम करण्यासाठी सज्ज आसतात.
तीन मुलांपैकी थोरली मुलगी कोमल दोन वेळा आंतरराष्ट्रीय मॅटवरील कुस्तीसाठी खेळून आली आहे. एकदा 2015 साली यंगून म्यानमार एशियन गेम्समध्ये, तर दुसऱ्या वेळी किरगीजस्थान येथे वर्ड नोमाड गेम्स येथे मॅटवरील बेल्ट रेसलिंग स्पर्धांसाठी जाऊन आली आहे. दुसरा मुलगा रोहित हा दोन वेळा कुस्तीत नॅशनल झाला आहे, तर धाकटा तब्बल सहा वेळा बेल्ट रेसलिंग स्पर्धेत नॅशनल झाला असून पुढील महिन्यात पुन्हा एकदा त्याची नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दत्तात्रय जाधव यांची इच्छा पूर्ण करण्याचं स्वप्न तिन्ही लेकरांसमोर आहे. त्यासाठी प्रचंड मेहनत तिघेही घेत आहेत.
ज्या लोकांनी समाजाने त्यांना मूलीला कुस्तीगीर होण्यासाठी विरोध केला होता, त्यांनीच शहरातून वाजत-गाजत मिरवणूक काढली. जाधव कुटुंबाच्या घरी पदकं आणि पारितोषिकांचा ढीग आहे.
कुस्तीतल्या या यशासाठी त्यांना येथील मारकड कुस्ती केंद्राचा जास्त फायदा झाला आहे. मॅटवरील सर्व अवघड कसरती इथे करता येत आहेत. मूलीला तालीम करण्यासाठी मूलगी मिळत नसल्याने त्यांनी स्वतःच्या दूसऱ्या मुलासोबत कसरती केल्या.
कोमल जाधव दोन वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्ती खेळून आली आहे. त्यात तिला यश मिळालं नसलं, तरी येत्या काळात देशासाठी ऑलिम्पिकमध्ये खेळून पदक मिळवण्याचं स्वप्न कोमल जाधव आणि तिच्या भावांसमोर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement