Job Majha : BPCL, महावितरण आणि Maha IT या ठिकाणी विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज
Job Majha : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., महावितरण, महा आयटी आणि अमरावतीतील या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरू आहे.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., महावितरण, महा आयटी आणि अमरावतीतील या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,
BPCL (भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.)
पोस्ट - पदवीधर, डिप्लोमा अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता - पदवीधर अप्रेंटिससाठी इंजिनिअरिंग पदवी, डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा - 87 (यात पदवीधर अप्रेंटिससाठी 42 जागा, डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी 45 जागा आहेत.)
वयोमर्यादा - 18 ते 27 वर्ष
नोकरीचं ठिकाण - मुंबई
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख - 5 ऑक्टोबर 2022
तपशील - www.bharatpetroleum.in
महावितरण, हिंगोली
पोस्ट - अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन, वायरमन)
शैक्षणिक पात्रता - ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)
एकूण जागा - 100 (यात इलेक्ट्रिशिन आणि वायरमन अप्रेंटिससाठी प्रत्येकी 50 जागा आहेत.)
नोकरीचं ठिकाण - हिंगोली
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 9 सप्टेंबर 2022
तपशील - www.mahadiscom.in
महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित ( Maha IT Corporation Ltd)
पोस्ट - डेप्युटी जनरल मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर, अकाऊंट ऑफिसर, अकाऊंट असिस्टंट, कंटेंट रायटर, नेटवर्क स्पेशालिस्ट, सिनियर नेटवर्क इंजिनिअर, नेटवर्क इंजिनिअर, ओ आणि एम लीड, ओ आणि एम इंजिनिअर, आयटी ऑफिसर असिस्टंट, सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनिअर, सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर ( GIS विश्लेषक), NOC व्यवस्थापक, नेटवर्क व्यवस्थापक, IT पायाभूत सुविधा व्यवस्थापक, O & M व्यवस्थापक, RFMS विशेषज्ज्ञ (GIS तज्ज्ञ), MIS तज्ज्ञ
एकूण जागा - 32
अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी आहे. - hr1.mahait@mahait.org
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 सप्टेंबर 2022
तपशील - mahait.org (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये current openings वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
डॉ.पंजाबराव देशमुख योग महाविद्यालय, अमरावती
पोस्ट - प्राचार्य, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण शिक्षक, सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता - प्राचार्य पदासाठी पदव्युत्तर पदवी, पीएचडी, ग्रंथपालसाठी एम.लिब./ पीएचडी, शारीरिक शिक्षण शिक्षक पदासाठी एम.पी.एड्., सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पदव्युत्तर पदवी ही पात्रता हवी.
एकूण जागा - 9
अर्ज पाठवण्याचा पत्ता - डॉ. पंजाबराव देशमुख योग महाविद्यालय, उदय कॉलनी, चांदूर बाजार, जिल्हा- अमरावती, महाराष्ट्र - 444704
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 10 सप्टेंबर 2022