जॉब माझा : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, डॉ. बाबासाहेब टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी विविध पदांची भरती, कसा कराल अर्ज?
नोकरी करण्यासाठी इच्छूक असणाऱ्यांसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, डॉ. बाबासाहेब टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी येथे काम करण्यासाठी संधी आहे. जाणून घ्या अर्ज कसा आणि कुठे कराल.
मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. तर पाहुयात आज कुठे नोकरीची संधी आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 623 जागांसाठी भरती
पदाचे नाव - ट्रेनी इंजिनिअर-I, प्रोजेक्ट इंजिनिअर-I
एकूण जागा - अनुक्रमे 308, 203
शैक्षणिक पात्रता : BE/B.Tech आणि प्रोजेक्ट इंजिनिअर-I दुसऱ्या पदासाठी 2 वर्षांचा अनुभव
वयाची अट: 01 ऑगस्ट 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 18 ते 25 वर्षे
पद क्र.2: 18 ते 28 वर्षे
नोकरी ठिकाण: बेंगळुरू कॉम्प्लेक्स
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2021
दुसरी पोस्ट - अप्रेंटिस
एकूण जागा - 112 जागा
पदाचे नाव - फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, COPA
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेडमध्ये ITI/NCVT उत्तीर्ण
वयाची अट : 30 सप्टेंबर 2021 रोजी 21 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2021
अधिकृत वेबसाईट - www.bel-india.in (करिअर पर्यायावर क्लिक करा तुम्हाला सविस्तर माहिती आणि ऑनलाईन फॉर्म उपलब्ध होईल)
आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नाशिक
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी
एकूण जागा - 9
शैक्षणिक पात्रता : बी.ए.एम.एस
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑगस्ट 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता - आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नाशिक
(दरम्यान ही पदं तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार असून 31 मार्च 2023 रोजी याचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे.)
डॉ. बाबासाहेब टेक्नोलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे रायगड इथे वकिलांकरता भरती होणार आहे
एकूण जागा - 12
शैक्षणिक पात्रता - LLB/LLM
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख - 15/08 / 2021
अर्ज पाठविण्यासाठी मेल आयडी- registrar@dbatu.ac.in
अधिकृत वेबसाईट - www.dbatu.ac.in