एक्स्प्लोर

शरद पवार यांनी बाप नाही बदलला ते स्वतःच बाप झाले : जितेंद्र आव्हाड

गणेश नाईक यांच्या विधानाने त्यांच्या कृतघ्नतेवर शिक्कामोर्तब झाले, अशी टीका गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून आमदार गणेश नाईक आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

ठाणे : नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्यात उफाळून आलेलं वाग्युद्ध संपण्याची चिन्हं नाहीत. किंबहुना एकमेकांवरच्या आरोप-प्रत्यारोपानं ते अधिकच चिघळत चाललं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर बाप बदलणारा नेता असा आरोप केला होता. त्यानंतर गणेश नाईक यांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं. त्यावर गणेश नाईक 'दादां'च्या विधानावरुन एक लक्षात आले, की गणेश नाईक कृतघ्न आहेत. ज्या शरद पवार यांनी त्यांच्यावर उपकार केले. त्यांचेच नाव घेऊन त्यांनी आपल्या कृतघ्नतेवर शिक्कामोर्तब केलं, असा जोरदार टोला गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. विकासकामांसाठी आणि स्वाभिमानासाठी आपण पक्ष बदलले आहेत. पण आपल्या आधी शरद पवार यांनीही अनेकवेळा पक्षबदल केला आहे. त्यामुळं पक्ष बदलणाऱ्या शरद पवार यांच्याविषयी जितेंद्र आव्हाड काय भूमिका घेणार, असा प्रश्न गणेश नाईक यांनी विचारला होता. त्यावर आव्हाड यांनी नाईक कृतघ्न असल्याची टीका केलीय. कोपरखैरणेतल्या सभेत गणेश नाईक हे नवी मुंबईतील खंडणीखोर नेते असल्याचा आरोप करून, आव्हाड यांनी नाईकांचं साम्राज्य नामशेष करण्याचं लोकांना आवाहन केलं होतं. त्यावर उत्तर देताना गणेश नाईकांनी 'ये तेरा काम नही है, तेरे बाप को भेज' असं म्हणून आव्हाडांवर प्रतिहल्ला चढवला. त्यानंतर त्या दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा खेळ रंगला आहे. ... तर पवार साहेबांचाही बाप काढणार का? गणेश नाईकांचं आव्हाडांना प्रत्युत्तर शरद पवार यांनी बाप नाही बदलला ते बाप झाले पक्षांतर करणार्‍या शरद पवारांची गणनाही बाप बदलणार्‍या औलादींमध्ये करणार का?, असा सवाल करत गणेश नाईक यांनी आव्हाड यांच्यावर टीका केली. त्यांच्या या टीकेला डॉ. आव्हाड यांनी अत्यंत समर्पक भाषेत उत्तर दिले आहे. डॉ. आव्हाड यांनी म्हटले आहे, की शरद पवारांचा इतिहास गणेश नाईक यांना कितपत माहित आहे, हे मला माहित नाही. पवारसाहेबांनी बाप नाही बदलला ते स्वत:च बाप झालेत. 1977 आणि 1999 साली पक्ष काढला अन् तुमच्यासारखे 60 ते 70 आमदार निवडून आणले. त्याला बाप बदलणं म्हणत नाही. त्याला बाप होणे म्हणतात. माझ्यासारख्या गरीबाच्या पोराला इथपर्यंत आणला ते बाप झाले म्हणून; तुम्ही बाप बदलत गेलात. बाप बदलणाऱ्याची माझी औलाद नाही, माझा एकच बाप शरद पवार : जितेंद्र आव्हाड गणेश नाईक तुम्ही कृतघ्न आहात : आव्हाड एवढेच नाही तर आजच्या तुमच्या विधानाने दाखवून दिले की तुम्ही कृतघ्न आहात. मला हेच नवी मुंबईकरांना दाखवायचे होते. ते मी पुराव्यानिशी मी दाखवून दिले. तुम्ही कधी आगरी समाजाची घरे पाडत असताना गेला नाहीत. मी विटाव्याची घरे पाडत असताना गेलो होतो. जेव्हा-जेव्हा आगरी समाजावर संकट आलं तेव्हा तेव्हा तुम्ही कायद्याची चौकट दाखवत निघून गेलात. पुन:र्सिमांकन झाले पाहिजे, हे दाखवून देण्याची ताकद आमच्यात आहे. ते आम्ही करुन दाखविले. तुम्ही ते नाही केलेत. आपला राजकीय हेतू साध्य व्हावा, यासाठी आपल्या पोराला बळी दिलात. तेव्हा समाज कुठला? तेव्हा नाईकसाहेब बोलण्यासारखे खूप काही आहे. फक्त मला एवढेच दाखवायचे होते की तुम्ही कृतघ्न आहात; तुमच्यावर केलेल्या उपकारांची तुम्हाला कधीही जाणीव नसते. आगरी समाजाने असो, नवी मुंबईकरांनी असो, ती बाळासाहेबांनी असो अगर ती शरद पवारांनी असो तुम्ही त्यांची जाण कधीच ठेवली नाही. महत्वाचे म्हणजे बाप काढण्याचे विधान तुमचे आहे; मी बाप काढला नाही. कुठल्या तरी फडतूस पिक्चरचा डायलॉग वापरुन तुम्ही बाप काढला होता. त्यामुळे तुम्ही खाली घसरलात की मी हे आठवले तर बरे!, असेही मंत्री आव्हाड यांनी म्हटले आहे. Jitendra Awhad Vs Ganesh Naik | ...तर पवार साहेबांचाही बाप काढणार का? : गणेश नाईक

महत्त्वाच्या बातम्या

बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Embed widget