एक्स्प्लोर
छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र : आव्हाड
36 हजार एकर जमीन असणारे उदयनराजे दोन लाखांची खंडणी मागतील का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे.

मुंबई : साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयन राजे यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसनं उदयनराजेंच्या समर्थनात मोहीम सुरु केली आहे. 36 हजार एकर जमीन असणारे उदयनराजे दोन लाखांची खंडणी मागतील का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे. साताऱ्यात 36 हजार एकर जमीन असणाऱ्या उदयनराजेंना 2 लाखांच्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक म्हणजे छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाडांनी ट्विटरवरुन केला आहे. https://twitter.com/Awhadspeaks/status/888260370858516481 https://twitter.com/SATAVRAJEEV/status/888263462836502528 आव्हाडांचं हेच ट्वीट रिट्वीट करुन त्यावर छत्रपतींना बदनाम करण्याचे कारस्थान महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असं म्हणत काँग्रेसचे खासदार राजीव सातवांनी पाठिंबा दिला आहे. लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे भोसलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा























