एक्स्प्लोर
भाजपची सूज लवकरच उतरेल: जयंत पाटील

मुंबई : सत्तेत गेल्यानंतर सूज येतेच. आम्हालाही आली, मात्र ती सूज येण्यासाठी बराच वेळ लागला. पण भाजपला अल्पावधितच सूज आली आहे. सध्याचं वातावरण पाहाता, त्यांची सूज लवकरच उतरेल, असा निशाणा राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी साधला.
जयंत पाटील यांनी आज एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात मनमोकळ्या गप्पा मारल्या.
भाजपला सूज
सत्तेत गेल्यानंतर राजकीय पक्षाला सूज येते. आम्हालाही आली होती. मात्र आम्ही आता जमिनीवर येऊन लोकांशी नाळ जोडण्याचा पुन्हा प्रयत्न करत आहोत. पण अल्पावधितच भाजपला सूज आली आहे. ग्रामीण भागात भाजपविरोधात वातावरण आहे. हे सरकार शेतकरीविरोधी आहे. त्यामुळे त्यांची सूज लवकर उतरेल, असा विश्वास आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
लॉटरी घोटाळा झालाच नाही
जयंत पाटील यांच्यावर लॉटरी घोटाळा केल्याचा आरोप आहे. मात्र ज्यावेळी मी अर्थमंत्री होतो, त्यावेळी सर्वपद्धती नियमानुसारच केल्याचा दावा पाटील यांनी केला. मुळात घोटाळा हा शब्दच चुकीचं असल्याचं ते म्हणाले.
ती भेट राजकीय नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये. मोदी गुजरातचे पंतप्रधान होते आणि पवार हे केंद्रीय कृषीमंत्री होते, त्यावेळपासून दोघांच्या भेटी-गाठी होतात. मात्र या भेटीचा अर्थ राजकीय नाही, असं पाटील म्हणाले.
अंतर्गत स्पर्धेमुळे खडसेंचा बळी
एकनाथ खडसे हे ज्येष्ठ मंत्री होते. मात्र त्यांच्यावर थेट दाऊद कॉलप्रकरणाचा आरोप झाला. तसंच जमीन गैरव्यवहारातही खडसे अडकले. मात्र मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा आणि अंतर्गत कुरघोड्यांमुळेच खडसेंचा बळी गेळा, असं जयंत पाटील म्हणाले. अवघ्या दीड वर्षात ज्येष्ठ मंत्र्यावर ही वेळ आली, त्यावरुन या सरकारचा कारभार दिसून येतो, असंही त्यांनी नमूद केलं.
गुन्हा सिद्ध होण्याआधीच भुजबळांना शिक्षा
छगन भुजबळ यांच्यावर आरोप झाले, मात्र ते सिद्ध होण्यापूर्वीच त्यांना तुरुंगात टाकलं आहे. ही नवीनच पद्धत आली आहे, असं म्हणत जयंत पाटील यांनी युती सरकारवर निशाणा साधला.
'त्या' वक्तव्यामुळे युतीत तणाव
विधानसभा निवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळाल्या, त्यामुळे शरद पवारांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा जाहिर केला. मात्र ती त्यावेळची राजकीय खेळी होती. त्या वक्तव्यामुळेच युती सरकार कसं चाललंय हे सध्या आपण पाहतोय, असं जयंत पाटील म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
विश्व
बीड
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
