एक्स्प्लोर

अनगरमध्ये प्रसिद्धीसाठी ड्रामेबाजी, बुद्धिवंतांना फॉर्म भरण्यासाठी सूचक लागतात याचीही माहिती नाही, जयकुमार गोरेंचा उमेश पाटलांना टोला

अनगर येथे झालेला प्रकार हा विरोधकांनी केवळ प्रसिद्धीसाठी केलेली ड्रामेबाजी होती असा टोला पालकमंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore ) यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटलांना लगावला.

Jayakumar Gore on Umesh patil : अनगर येथे झालेला प्रकार हा विरोधकांनी केवळ प्रसिद्धीसाठी केलेली ड्रामेबाजी होती असा टोला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore ) यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh patil)  यांना लगावला. ज्यांना अनगरमध्ये दहशतीचे वातावरण आहे असे दाखवायचे होते अशा बुद्धिवंतांना फॉर्म भरण्यासाठी सूचक लागतात याचीही माहिती नव्हती अशी टीकाही गोरे यांनी उमेश पाटलांवर केली. 

वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होतोय

विनाकारण अनगर मध्ये दहशत आहे असे वातावरण तयार करत तेथील नेतृत्वावर आरोप करण्याचा प्रकार झाला आहे. कोणालातरी फॉर्म भरु दिला जात नाही असे वातावरण तयार करून सोलापूर किंवा मोहोळमध्ये पोलीस बंदोबस्त मागण्यात आला. मात्र जिथे फॉर्म भरायचा होता तिथे व्यवस्थित पोलीस बंदोबस्त होता. जेव्हा ते फॉर्म भरायला गेले तेव्हा तिथे एकही माणूस नव्हता. सुखरूप फॉर्म भरुन परत आले फक्त वातावरण बिघडवण्याचा हा प्रयत्न होता असा आरोप पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे.

फक्त प्रसिद्धीसाठी केलेली ही ड्रामेबाजी 

ज्यांना अनगरमध्ये दहशतीचे वातावरण आहे असे दाखवायचे होते अशा बुद्धिवंतांना फॉर्म भरण्यासाठी सूचक लागतात याचीही माहिती नव्हती असा टोला अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना लगावला. यांना इथे निवडणूक लढवायचीच नव्हती किंवा त्यांची क्षमताच नव्हती फक्त प्रसिद्धीसाठी केलेली ही ड्रामेबाजी होती अशा शब्दात जयकुमार गोरे यांनी समाचार घेतला. आज अनगरकर बोलले त्या वेळेला ते तुम्हाला खालच्या पातळीवरचे वाटले मात्र त्यांचे विरोधक उमेश पाटील यांनी त्यांच्यावर केलेली टीका कोणत्या पातळीवरची होती, यावरही चर्चा झाली पाहिजे असे सांगत सर्वांनीच राजकारणात व्यक्तिगत टीका टाळून आचारसंहिता पाळली पाहिजे असा सल्ला जयकुमार गोरे यांनी दिला.

मोहोळच्या दोन पाटलांचा वाद काय? (Mohol Rajan patil contraversy)

मोहोळ तालुक्याच्या राजकारणात माजी आमदार राजन पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील या दोघांचे नावं कायम चर्चेत राहते. राजन पाटील हे अनगरचे तर उमेश पाटील हे मोहोळ तालुक्यातल्या नरखेडचे रहिवासी. निवडणूक कुठलीही ही असली तरी ह्या दोघा पाटलांचा वाद-प्रतिवाद कायम पाहायला मिळतो. ह्या नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुका देखील त्याला अपवाद ठरल्या नाहीत. अनगर पंचायत बिनविरोध करण्याच्या प्रयत्नाला छेद देण्यासाठी उमेश पाटलांनी गावातीलच असलेल्या उज्वला थिटे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे उमेदवारी जाहीर केली.

महत्वाच्या बातम्या:

अनगरमध्ये 60 वर्षात पहिल्यांदाच निवडणूक, राजन पाटलांना भिडणाऱ्या उज्ज्वला थिटे कोण; मोहोळच्या वादाची A टू Z स्टोरी

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Pune Umesh Appa Tagunde Baba Marathi News: शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
शिष्य येतात, पाय धुऊन पाणी पितात; पुण्यातील अध्यात्मिक गुरु उमेश तागुंदेंची चर्चा, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Pune Chakan MIDC: पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी, चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आली, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Embed widget