एक्स्प्लोर
शेतकऱ्यांच्या इच्छेप्रमाणे संप पुन्हा सुरु : जयाजी सूर्यवंशी
मुंबई : "मी चूक केलीय असं वाटत असेल, तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची माफी मागतो. शेतकरी जर संपावर ठाम असतील तर मी त्यांच्यासोबत आहे," असं किसान क्रांती संघटनेचे नेते जयाजी सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं. पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना जयाजी सूर्यवंशी यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून उत्तरं दिली.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर शेतकरी संप मागे घेतल्याची घोषणा केली असली, तर शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं चित्र आहे. त्यातच किसान क्रांतीचे नेते जयाजी सूर्यवंशी यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. जयाजी सूर्यवंशी यांना सरकारने ‘मॅनेज’ केल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर जयाजी सूर्यवंशी यांनी एबीपी माझावरुन आपली भूमिका स्पष्ट केली.
माझी चूक झाली, पण मी शेतकऱ्यांसोबत कायम आहे. संप स्थगित केला होता, जर संप सुरु ठेवायचा असेल तर मी शेतकऱ्यांसोबत आहे, असं जयाजी सूर्यवंशी म्हणाले.
याशिवाय मी कुणाच्या एका पैशाच्या मिंद्यात नाही, मी शेतकऱ्यांसोबत आहेत, त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहे, असं त्यांनी नमूद केलं.
जयाजी सूर्यवंशींना काहीतरी मिळालंय, त्यामुळे त्यांनी तडजोड केलीय, त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी यावेळी पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी केली.
त्यावर माझा बळीचा बकरा झालाय, मी नेता म्हणून सरकारकडे गेलो नाही. माझी चूक झाली, मी बिनशर्त सर्व शेतकऱ्यांची माफी मागतो, असं जयाजी सूर्यवंशी यांनी नमूद केलं.
महत्त्वाचे मुद्दे
माझी चूक झाली, पण मी शेतकऱ्यांसोबत कायम - जयाजी सूर्यवंशी
संप स्थगित केला होता, जर संप सुरु ठेवायचा असेल तर मी शेतकऱ्यांसोबत - जयाजी सूर्यवंशी
मी कुणाच्या एका पैशाच्या मिंद्यात नाही, मी शेतकऱ्यांसोबत, खांद्याला खांदा लावून लढायला तयार- जयाजी सूर्यवंशी
जयाजी सूर्यवंशींना काहीतरी मिळालंय, त्यामुळेत त्यांनी तडजोड केलीय : पुणतांब्यातील शेतकरी
माझा बळीचा बकरा झालाय : जयाजी सूर्यवंशी
पुणतांब्यात जाऊन माफी मागायलाही मला कमीपणा वाटणार नाही, मी त्यांचाच मुलगा आहे : जयाजी सूर्यवंशी
माझं काही चुकलं असेल तर मी शेतकऱ्यांची माफी मागतो: जयाजी सूर्यवंशी
जयाजी सूर्यवंशींनी महाराष्ट्राची माफी मागावी, पुणतांब्यातील शेतकऱ्यांची मागणी
कोअर कमिटीत मी एकटाच नव्हतो, माझ्यासोबत आणखी सदस्य होते : जयाजी सूर्यवंशी
माझ्या मनात काहीच पाप नाही, सदाभाऊंशी चळवळीतील मैत्री : जयाजी सूर्यवंशी
माझे आणि भाजपचे संबंध असल्याचं सिद्ध करा, दोषी असेल तर फाशी द्या : जयाजी सूर्यवंशी
जे कोणी आरोप करतायेत त्यांना जयाजी सूर्यवंशीचं कार्य माहित नाही: जयाजी सूर्यवंशी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement