एक्स्प्लोर
मित्रासोबत फिरायला गेलेल्या अल्पवयीन तरुणीवर दोघांचा बलात्कार
जळगाव : मित्रासोबत फिरायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर दोन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये ही संतापजनक घटना घडल्याचं वृत्त आहे. चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
भुसावळमध्ये आयटीआय परिसरात मित्रासोबत फिरायला गेलेल्या 13 वर्षीय मुलीला चौघांनी पाहिलं. त्यानंतर आरोपींनी दोघांचा पाठलाग केला. रेल्वे पुलाखाली गेल्यावर पीडितेच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि धमकावलं. त्यावेळी इतर दोघांनी पीडितेवर आळीपाळीनं बलात्कार केला.
घटनेनंतर घाबरलेल्या तरुणीने संपूर्ण प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला. कुटुंबीयांनी याची तक्रार पोलिसात केली. या प्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर दोघांचा बलात्कार
काही दिवसांपूर्वी जळगावात अशाच प्रकारची घटना घडली होती. मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर दोघांनी बलात्कार केला होता. भुसावळची तरुणी आपल्या मित्रासोबत जळगावातील यावल तालुक्यातल्या अकलूद शिवारात फिरायला गेली होती. आरोपी किरण कोळी आणि वासुदेव तायडे या दोघांनी पीडित तरुणी आणि तिच्या मित्राला मारहाण केली होती. त्यानंतर तरुणीचा मोबाईल हिसकावून घेत बंदुकीच्या धाकाने या दोघांनी तरुणीवर बलात्कार केला होता.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement