एक्स्प्लोर
Advertisement
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पास विरोध कायम, आज जेलभरो आंदोलन
प्रकल्पास स्थानिकांचा विरोध कमी झाला असं चित्र निर्माण केलं जातयं. मात्र आमचा आजही विरोध तितकाच प्रखर आहे हे दाखवण्यासाठी जेलभरो आंदोलन केलं जात असल्याचे समितीकडून सांगण्यात आलं आहे.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर जैतापूर इथल्या प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आज (सोमवार) स्थानिक नागरिक पुन्हा एकदा रस्त्यावर उतरत आहेत. या अणुऊर्जा प्रकल्पास विरोध दर्शवण्यासाठी जेलभरो आंदोलन केलं जात आहेत. जनहक्क सेवा समितीकडून हे आंदोलन केलं जाणार आहे.
प्रकल्पास स्थानिकांचा विरोध कमी झाला असं चित्र निर्माण केलं जातयं. मात्र आमचा आजही विरोध तितकाच प्रखर आहे हे दाखवण्यासाठी जेलभरो आंदोलन केलं जात असल्याचे समितीकडून सांगण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर आज जैतापूर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शाहिद तबरेज चौकात जमा होत स्थानिक या आंदोलनात उतरतील. दरम्यान शिवसेनेने केवळ आपली उपस्थिती न दाखवता आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी व्हावे असं आवाहन जनहित हक्क समितीने केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
पुणे
Advertisement