एक्स्प्लोर
Advertisement
शिवाजी महाराजांच्या वंशजांवर हिरा विकण्याची वेळ : शाम जाजू
‘शिवाजी महाराजांच्या वंशजांवर एकदा हिरा विकण्याची वेळ आली होती. पण एका व्यक्तीनं हा व्यवहार थांबवून भोसले कुटुंबाला आर्थिक मदत केली होती.'
औरंगाबाद : ‘शिवाजी महाराजांच्या वंशजांवर एकदा हिरा विकण्याची वेळ आली होती आणि मुंबईच्या बाजारपेठेत या हिऱ्याचा लिलाव करत असताना लिलाव थांबवून माहेश्वरी समाजाच्या एका व्यापाऱ्याने भोसले कुटुंबीयांना आर्थिक मदत केली होती.’ असा दावा भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू यांनी केला आहे. औरंगाबादेत झालेल्या भाषणात ते बोलत होते.
नेमकं काय म्हणाले शाम जाजू?
'छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज सातारची गादी एकदा त्या घराण्यातील लोक, त्या घराण्यातील वंशज आपल्या घरातील एक अमूल्य हिरा घेऊन मुंबईच्या झवेरी बाजारमध्ये विकण्यास गेले. कुठल्याही मोठ्या घरातील माणसावर सहसा अशी वेळ येत नाही. आली तरी तो माणूस पुढे राहत नाही. त्याने एक माणूस समोर केला. तो हिरा पाहून चार-पाच झवेरी एकत्र आले. ते म्हणाले की, ‘ही सामान्य गोष्ट नाही.’ ज्याने तो हिरा समोर केला त्याला विचारलं की, 'हे कुणाचं आहे?' तो म्हणाला, 'माझं आहे.', ‘ठिकं आहे मग तुझ्यासोबत कोण आलं आहे?’ एकानं हळूच परिचय करुन दिला. ‘हे सातारचे भोसले आहेत.’ मग तिथे चर्चा सुरु झाली. त्यानंतर त्या हिऱ्याचा लिलाव सुरु झाला.’
‘62 लाखापर्यंत हा लिलाव गेला आणि एकाला राहवलं नाही. तो माहेश्वरी बंधू होता झवेरी बाजारमध्ये काम करणारा. तो म्हणाला, ‘एक मिनिट थांबवा हे.’ त्यानंतर त्या भोसलेंना आणि त्यांच्या बरोबर आलेल्यांना त्यांने सोबत घेतलं. त्यानंतर त्या व्यक्तीनं त्यांना विचारलं की, ‘तुम्ही सातारचे शिवाजी महाराजांचे वंशज ना?’ ते म्हणाले ‘हो.’ ‘हा हिरा तुम्ही आणला आहे?’ ते म्हणाले ‘हो.’ त्यानंतर त्यानं विचारलं की, ‘तुम्हाला किती पैशाची गरज आहे?’ ते म्हणाले की, ‘आम्हाला 50 लाखांची गरज आहे.’ 62 लाखांपर्यत लिलाव आला होता. ते म्हणाले ‘तुम्ही तुमचा हा लिलाव मागे घ्या. हा हिरा तुम्ही परत घेऊन जा. शिवाजी महाराजांच्या संपत्तीची अशाप्रकारे बाजारात लिलाव आम्ही घेऊ शकत नाही आणि आम्ही करु देणार नाही.' असं जाजू यावेळी म्हणाले.
श्याम जाजू यांच्या वक्तव्याचा मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध
दरम्यान, श्याम जाजू यांनी केलेल्या वक्तव्याचा मराठा क्रांती मोर्चा कडून निषेध नोंदवण्यात आला. ‘जाजू यांनी वक्तव्याचे पुरावे द्यावेत अन्यथा, भाजपाने जाजू यांच्या वक्तव्याप्रकरणी जाहीर माफी मागावी.’ असं मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विनोद पाटील यांनी मागणी केली आहे.
VIDEO :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement