NIA Raid : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील छापेमारीमध्ये ISIS चा लव्ह जिहादचा अँगल? NIA चा तपास सुरू
NIA Action On ISIS : दहशतवाद्यांची एक मोठी टीम तयार करण्यासाठी अनेक विदेशी हस्तक भारतीयांच्या संपर्कात आहेत, जे भारतातील विविध राज्यांमधून तरुणांची भरती करत आहेत.
मुंबई : राष्ट्रीय एजन्सी एनआयएने (NIA) आज महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात केलेल्या छापेमारी व कारवाईनंतर इसिस मॉडूल (ISIS Module) हे पुन्हा एकदा राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या रडारवर आलेला आहे. मात्र इसिस ही दहशतवादी संघटना हे फक्त दहशतवादी कट रचण्यासाठी मनुष्यबळ तयार करत नसून इतर कामात सुद्धा व्यस्त आहेत. इसीस या संघटनेसाठी डॉक्टर्स, इंजिनियर्सच पुरवले जात होते. मात्र राष्ट्रीय एजन्सी लव जिहादचेसुद्धा (Love Jihad) काही प्रकरण आहे का याचाही आता तपास करत आहे.
ISIS ही एक जागतिक दहशतवादी संघटना (GTG) आहे, ज्याला इस्लामिक स्टेट (IS), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (ISIL), Daish, इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत (ISKP) / ISIS विलायत खोरासान/इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि शाम खोरासान (ISIS-K) या नावांनी ओळखलं जातं. देशातील विविध राज्यांमध्ये स्थानिकीकृत ISIS मॉड्यूल आणि सेल तयार करून ही संघटना भारतात आपले दहशतवादी नेटवर्क पसरवत आहे.
लव्ह जिहादच्या माध्यमातून भरती सुरू
ISIS ची एक मोठी टीम तयार करण्यासाठी अनेक विदेशी हस्तक भारतीयांच्या संपर्कात आहेत, जे भारतातील विविध राज्यांमधून तरुणांची भरती करत आहेत. NIA ने महाराष्ट्र आधारित मॉड्यूलचा पर्दाफाश केल्याने पडघा, ठाणे, कल्याण, पुणे आणि कर्नाटक यासारख्या विविध ठिकाणांहून नवीन भरती झालेल्यांचा सहभाग उघड झाला आहे.
ISIS या दहशतवादी संघटनेला लढण्यासाठी फक्त तरुणांचीच गरज नाही, तर टीममध्ये डॉक्टर, इंजिनिअर, ड्रायव्हर आणि अगदी महिलांचीही गरज आहे.
मात्र, महिला किंवा मुलींची भरती करण्यात आली होती का याचा तपास आता एजन्सी करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही वर्षांत केरळ आणि इतर राज्यांतील काही मुलींचे इस्लाम धर्म स्वीकारून त्यांना परदेशात नेहून इसिस या संघटनात सामील केला होते. तपास असे समोर आले होते की त्यांना कुराणातून शिकवणी देण्यात आली आणि आयएसआयएस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यास सांगण्यात आले होते.
मात्र यापूर्वी लव्ह जिहादचे कोणतेही प्रकरण घडले होते का, या प्रकरणात सुद्धा असा काही सहभाग दिसून येतो आहे का आणि असेल तर याचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न एजन्सी करत आहेत.
ही बातमी वाचा: