एक्स्प्लोर

हे बसस्थानक आहे की विमानतळ?

प्रशस्त फलाट, मोठे वाहनतळ, सर्व सोयींनी युक्त चौकशी कक्ष, माहिती कक्ष, सुविधाजनक तिकीट खिडक्या, प्रसाधनगृहे, पाण्याच्या सोयी, सीसीटीव्ही यंत्रणा, उपहारगृहे, अतिशय सुंदर भित्ती चित्रे आणि बरंच काही. अशा सोई सुविधांनी युक्त हे बसस्थानक बनवण्यात आले आहे.

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमधील बसस्थानक आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या बसस्थानकाला एखाद्या विमानतळासारखं बनवण्यात आलं आहे. त्यामुळे बसस्थानक बघण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. शिवाय बल्लारपूर बस स्थानकात सेल्फी पॉईंट ऊभारण्यात आलं असून तेथे अनेकांनी सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली आहे. या बसस्थानकाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरल होत आहे. तब्बल 14 कोटी रुपये खर्च करुन हे बसस्थानक बनवण्यात आले आहे. प्रशस्त फलाट, मोठे वाहनतळ, सर्व सोयींनी युक्त चौकशी कक्ष, माहिती कक्ष, सुविधाजनक तिकीट खिडक्या, प्रसाधनगृहे, पाण्याच्या सोयी, सीसीटीव्ही यंत्रणा, उपहारगृहे, अतिशय सुंदर भित्ती चित्रे आणि बरंच काही. अशा सोई सुविधांनी युक्त हे बसस्थानक बनवण्यात आले आहे. बल्लारपूर म्हणजे तेलंगणातून महाराष्ट्रत प्रवेश करताना लागणारं पहिले मोठे शहर. वूड सिटी, पेपर सिटी अशी शहराची ओळख. मात्र आता बल्लारपूरची नवीन ओळख येथील बसस्थानक झाली आहे. सध्या या बस स्थानकाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. वर्षभरापूर्वी 'मिनी भारत' समजल्या जाणाऱ्या या शहरात अत्याधुनिक बसस्थानक निर्मितीची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. यासाठी 14 कोटी रुपये निधी मंजूर केला गेला. दक्षिणेत ये-जा करण्यासाठी अत्यंत सोयीच्या असलेल्या या शहरात वर्दळीच्या भागात आणि शहराच्या मध्यभागी हे स्थानक उभारण्यात आले आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हा मतदारसंघ असल्यामुळे अगदी वेळेत हे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे आता सामान्य नागरिकांच्या हक्काची 'लाल परी' या अत्याधुनिक बस स्थानकात प्रवासी वाहतुकीसाठी दिमाखात सज्ज झाली आहे. बल्लारपूर बसस्थानकाचे वैशिष्ट्ये एक लाख स्केअर फूट क्षेत्रात हे बसस्थानक उभारण्यात आलं असून बस स्थानकाची इमारत ही जवळ-जवळ 40 हजार स्केअर फूट क्षेत्रात आहे. 500 लोकांच्या बसण्याची येथे व्यवस्था असून दिव्यांगांसाठी देखील खास सुविधा उभारण्यात आल्या आहेत. या अत्याधुनिक बसस्थानकावर सुविधा तर आहेतच, याशिवाय शहराच्या प्रमख भागातून नजरेस पडणारे द्विमितीय घड्याळ, आकर्षक रंगसंगतीचा वापर करून तयार केलेली अंतर्गत सजावट, व्हर्टिकल गार्डन, ठीक ठिकाणी तयार केलेले सेल्फी पॉईंट बल्लारपूरकरांच्या पसंतीस उतरले आहेत. लोकार्पणाच्या आधीच हे बस स्थानक बघण्यासाठी आणि इथल्या वेगवेगळ्या सेल्फी पॉईंट्स वर सेल्फी काढण्यासाठी नागरिकांची तोबा गर्दी उसळली आहे. जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वाघोबाची मनोहारी भित्तीचित्रे, सुबक वन्यजीव आणि जंगल चितारण्यात आले आहे. 'एवढे पंचतारांकित बसस्थानक आणि सुविधा उभारल्या आता नवीन बसेस देखील प्रवाशांच्या सोयीसाठी द्या' अशी सहज प्रतिक्रिया नागरिकांनी नोंदविली आहे. VIDEO | 14 कोटी खर्चून बल्लारपूर स्टॅंडचं रुपडं पालटलं | चंद्रपूर | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा

संबंधित बातम्या

एसटी स्टँड नव्हे, आता एअरपोर्टसारखंच 'बसपोर्ट'

महत्त्वाच्या बातम्या

State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश

व्हिडीओ

Mumbai Highway Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget