एक्स्प्लोर

अजित पवार 2019 साली राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार?

साडे तीन वर्षांपासून नागरिक ‘अच्छे दिन’ची वाट पहात आहेत. मात्र अच्छे दिनची गावागावात चेष्टा होऊ लागल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं.

अहमदनगर : 2019 साली परिवर्तन होणार आहे. राष्ट्रवादीचं सरकार येईल आणि अजित पवार प्रमुख असतील, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी केला आहे. ते अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या शाखेच्या उद्घटनावेळी बोलत होते. 2019 साली राष्ट्रवादीचं सरकार येऊन, अजित पवार प्रमुख असतील, असा दावा करुन धनंजय मुंडेंनी नव्या चर्चांना सुरुवात करुन दिली आहे. अजित पवार प्रमुख असतील म्हणजेच अजित पवार हे राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील का, असे प्रश्न उपस्थित करुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावेळी धनंजय मुंडे यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. मोदींच्या ‘अच्छे दिन’ची खिल्ली उडवत, काळा पैसा, स्वच्छता अभियान, महागाईवर सरकारला धारेवर धरलं. अजित पवार 2019 साली राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार? मुख्यमंत्र्यांवरही धनंजय मुंडेंनी जोरदार टीका केली. “भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक सरकार म्हणत आहेत. मात्र फडणवीस यांनी 2014 साली आमच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मात्र सत्तेत तीन वर्षे असून आतापर्यंत आरोप सिद्ध झाले नाहीत. फक्त चर्चा करुन वातावरण तापवलं. मात्र तीन वर्षात फडणवीस सरकारच्या 11 मंत्र्यांचे पुरावे दिले, मात्र फडणवीसांनी त्यांना क्लीन चीट दिली.”, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. साडे तीन वर्षांपासून नागरिक ‘अच्छे दिन’ची वाट पहात आहेत. मात्र अच्छे दिनची गावागावात चेष्टा होऊ लागल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच ‘अच्छे दिन’चं हाडूक गळ्यात अडकल्याचं म्हटलं. विदेशातून काळा पैसा आणून प्रत्येकाला 15 लाखांचं अश्वासन दिलं. मात्र जनता अजूनही पैशाची वाट पहात असल्याचं मुंडे यांनी म्हटलं. विरोधात असताना भाजपवाले महागाईच्या गप्पा मारत होते. पेट्रोल 55 वरुन  80 वर गेलंय. गॅस, डाळीचे भाव गगनाला भिडलेत. मात्र पंतप्रधान ‘मन की बात’मधून दर कमी होईल हे सांगत नसल्याचा आरोप त्यांनी केला. धान्य महाग झाल्यावर पंतप्रधानांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 6 कोटी शौचालयांचं अश्वासन दिलं. मात्र खायला अन्न नसून जनता उपाशी मरत आहे. खाये इंडिया तो ही जाये इंडिया, असं म्हणत खायलाच अन्न नसताना शौचालयाचं स्वप्न दाखवल्याचा आरोप त्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
लोकांची दिवाळी 'गोड' होणार! FDA मधून बदली नाही, भेसळयुक्त अन्न, औषधांविरोधात लढाई सुरूच; MPSC मध्ये बदलीच्या चर्चेवर तुकाराम मुंढेंची पोस्ट
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget