एक्स्प्लोर
डीएसकेमध्ये सुमारे 200 कोटी गुंतवलेले कोल्हापूरकर हतबल!
पुण्यातील डीएसके ग्रुपमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 600 हून अधिक ठेवीदारांनी तब्ब्ल 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
कोल्हापूर: पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांच्याविरोधात पुण्यातील गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्यानंतर, आता कोल्हापुरातूनही तक्रारी होत आहेत.
पुण्यातील डीएसके ग्रुपमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 600 हून अधिक ठेवीदारांनी तब्ब्ल 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ठेवींची मुदत संपूनही ठेवीदारांना रक्कम परत मिळत नसल्याने ठेवीदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. पोलिसांनी डी. एस. कुलकर्णी यांचे मुंबईतील घर आणि कार्यालयांवर छापे टाकल्यानंतर, कोल्हापुरातील ठेवीदारांनीही पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली.
लवकरच राजारामपुरी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
ठेवींची मुदत संपल्याने गेल्या वर्षभरापासून रक्कम परत मिळवण्यासाठी, कोल्हापुरातील ठेवीदारांकडून पाठपुरावा सुरू आहे. ठेवीदारांनी पुण्यात जाऊन डी. एस. कुलकर्णी यांची भेट घेऊन ठेवीच्या रकमा परत मिळाव्यात, अशी मागणी केली.
वर्षांत 22 वेळा बैठका घेतल्या, मात्र ठेवीदारांना रक्कम मिळालेली नाही. खुद्द डी. एस. कुलकर्णी यांनीही दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. याविरोधात कोल्हापुरातील ठेवीदार एकवटले असून, शुक्रवारी 15 ते 20 ठेवीदारांनी वकिलांसह पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांची भेट घेतली.
पोलिस अधीक्षक मोहिते यांनी ठेवीदारांचे म्हणणे ऐकूण फसवणुकीविरोधात तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले. दाखल तक्रारीनुसार पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
डीएसकेंविरोधात पुणे आणि मुंबईत आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. पुण्यात सुमारे 12 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. कोल्हापुरात ठेवीदारांनी मोठी रक्कम गुंतवल्याने फसवणुकीचा आकडा 200 कोटींच्या पुढे जाणार आहे.
डीएसकेमध्ये ठेवलेल्या ठेवी परत मिळत नसल्याने जिल्ह्यातील ठेवीदार एकवटले आहेत. ठेवीदारांनी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रविवारी उद्यमनगरातील डीएसके ग्रुपच्या कार्यालयात मेळाव्याचे आयोजन केले आहे. ठेवीदारांनी मेळाव्याला येताना ठेव पावतीच्या झेरॉक्स प्रती आणाव्यात असे आवाहन ठेवीदार असोसिएशनने केले आहे.
संबंधित बातम्या
अखेर डीएसकेंच्या घरी पोलीस पोहोचले!
शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट
एसकेंविरोधात हजारो गुंतवणूकदार एकवटले, पोलिसात तक्रार
डीएसकेंच्या अडचणीत वाढ, पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
डीएसकेंवर सात गुन्हे दाखल, ड्रीम सिटी प्रकल्प विक्रीला
डीएसकेंचा 1200 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांचा आरोप
डीएसकेंच्या अडचणीत वाढ, गुंतवणूकदारांकडून पोलिसात तक्रार
शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement