Cyclone Nisarga | चक्रीवादळाचा धोका टाळण्यासाठी वसई, पालघर, डहाणू तालुक्यातील उदयोग, खाजगी आस्थापना बंद
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावासोबतच महाराष्ट्रासमोर नवं संकट उभं ठाकलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे.
पालघर : निसर्ग चक्रीवादळाचा धोका टाळण्यासाठी वसई, पालघर, डहाणू तालुक्यातील उदयोग, खाजगी आस्थापना बंद राहतील. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार निसर्ग चक्रीवादळामुळे 3 जून रोजी पालघर जिल्हयातील समुद्रकिनारी असलेल्या वसई, पालघर, डहाणू तालुक्यातील सर्व उद्योग, उद्योग आस्थापना, सर्व दुकाने, खाजगी आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
या चक्रीवादळामुळे वसई, पालघर, डहाणू तालुक्यामध्ये हानी होण्याची शक्यता असून अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीचा विचार करता पालघर जिल्हयातील वसई, पालघर, डहाणू तालुक्याच्या किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांची सुरक्षा अबाधित रहावी व कोणत्याही प्रकारची जिवीतहानी तसेच आर्थिक हानी होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
चक्रीवादळाच्या अनुषंगाने औद्योगिक आस्थापनांनी कारखान्यांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून Safe Shut Down बाबत योग्य ती दक्षता घ्यावी व त्यामधून कोणतेही रसायन अथवा वायु यांचे उत्सर्जन होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. या कालावधीत सदर तालुक्यातील अत्यावश्यक सेवा व दुकाने चालू राहतील,असेहि जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
Cyclone Nisarga | निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पालघर, रत्नागिरी सिंधुदुर्गात अलर्ट
संबंधित बातम्या :
- Cyclone Nisarga | मुंबईतील सर्व यंत्रणा सतर्क, नागरिकांनी योग्य खबरदारी बाळगावी : महापालिका आयुक्त
- Cyclone Nisarga | निसर्ग चक्रीवादळ आणि एकूणच चक्रीवादळांबद्दल महत्त्वाची माहिती!