एक्स्प्लोर

Indrayani River Bridge Collapses  :  वृद्धाचा जगण्यासाठी संघर्ष! चेहरा बाहेर शरीर मात्र पुलाच्या सांगाड्याखाली

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा ये‌थील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची (Indrayani River Bridge Collapses) धक्कादायक घटना घडली आहे.

Pune Indrayani River Bridge Collapses :  पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा ये‌थील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची (Indrayani River Bridge Collapses) धक्कादायक घटना घडली आहे.  यामध्ये 20 ते 25 पर्यटक बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 32 जण झखमी झाले आहेत. यामध्ये 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. दरम्यान, या दुर्घटनेत अनेक जण नदीत वाहून गेले आहेत. तर काही जण कोसळलेल्या पुलाच्या सांगाड्याखाली अडकले आहेत. एका वृद्धाचा चेहरा नदीच्या पाण्याबाहेर दिसला. तर बाकीचं शरीर हे पुलाच्या सांगाड्याखाली अडकल्याचं बघायला मिळालं. दरम्यान सध्या बचावकार्य सुरु आहे.

अहमदाबादमधील विमान अपघातात 270 जण दगावल्याची बातमी ताजी असताना आज केदारनाथ यात्रेला जाणाऱ्या भक्तांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघाताची घटना समोर आल्यानंतर लगेच आज दुपारी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील लोखंडी पूल कोसळल्याची घटना समोर येत आहे. या घटनेमुळेदेखील मोठी खळबळ उडाली आहे. मावळ तालुक्यात कुंडमळा हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. इथे आज रविवार असल्याने हजारो पर्यटक आले होते. यावेळी इंद्रायणी नदीवर उभा असलेला लोखंडी पूल कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे 20 ते 25 जण नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती आहे. तर काही जण तुटलेल्या पुलाच्या सांगाड्याखाली अडकले आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती मिळाली आहे. 

कटरच्या सहाय्याने कापले लोखंडी पुलाचे भाग,  वृद्धाला बाहेर काढण्यात यश 

दरम्यान, पूल कोसळल्यानंतर अनेकजण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. तर काहीजण पुलाच्या सांगाड्याखाली अडकले आहेत. याचवेळी एक वृद्ध देखील पाण्याखाली अडकला होता. या वृद्धाचे तोंड पाण्याबाहेर होतं. तर बाकीचं शरीर हे पुलाच्या सांगाड्याखाली अडकलं होतं. गेल्या तीन तासांपासून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. पण बचाव पथकाला यश मिळताना दिसत नव्हतं. अखेर एनडीआरएफच्या पथकाला कटरच्या सहाय्याने लोखंडी पुलाचे भाग कापावे लागले. त्यानंतर पथकाला वृद्धाला बाहेर काढण्यात यश आलं आहे. 

नेमकी कशी घडली घटना? 

पूल कोसळल्याची घटना नेमकी कशी घडली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, आमचा 25 ते 30 जणांचा समूह पुलावर होता. एकाच ठिकाणी काही वेळ आम्ही सर्वजण थांबलो होतो. आम्ही पुलावर असतानाच काही कळायच्या आतच पूल कोसळल्याने बरेच जण खाली पडले. त्यातील काही लोक लगेच नदीच्या काठावर आले. परंतु काही लोक पाण्यात पडून बुडाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे. वाहून गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नदीवरील पूल अतिशय जीर्ण झालेला होता. त्याच पुलावर पर्यटक समूहाने फोटो काढत होते. नदीच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाण्याचा प्रयत्न पर्यटकांचा होता. मात्र पुलाची क्षमता कमी असल्याने आणि भार अधिक झाल्याने पूल कोसळल्याची घटना घडल्याचे प्रथमदर्शनी बोलले जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर तातडीने प्रशासनाने बचावकार्य सुरु केले आहे. काही जणांना बाहेर काढण्यात यश देखील आलं आहे. 

महत्वाच्या बातम्या:

आम्ही 25 ते 30 जण पुलावर होतो, काही कळायच्या आतच पूल कोसळला, प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार 

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget