एक्स्प्लोर
सांगलीत गवारेडा भरवस्तीत घुसला, स्थानिकांमध्ये घबराट
सांगली शहरात भरवस्तीत काल रविवारी रात्री अचानक गवारेडा घुसला.
सांगली : सांगली शहरात भरवस्तीत काल रविवारी रात्री अचानक गवारेडा घुसला. गणपती पेठ परिसरात तसंच गवळी गल्लीमध्ये गवारेड्यानं आपली वर्दी दिली. त्यामुळे काहीकाळ सांगलीकरांमध्ये भीतीचं वातावरण होतं.
सांगलीत गव्याच्या हजेरीमुळे काही काळ दहशतीचं वातावरण होतं. परिसरातील युवकांनी गव्याचा पाठलाग केल्यामुळे त्यानं नदी काठावर धूम ठोकली. अंधाराचा फायदा उठवत रेडा पसार झाला. मात्र रात्री उशिरा वन विभागानं गव्यासाठी शोधकार्य सुरु केलं होतं.
पहाटेपर्यंत या गव्यासाठी शोधकार्य सुरु होतं. मात्र अंधारामुळे गवा सापडला नाही. सकाळपासून पुन्हा गवा रेड्यासाठी वन विभागानं शोधमोहीम सुरु केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement