एक्स्प्लोर

Ind vs Pak : भारत-पाकिस्तान सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग दाखवणार नाही, ठाकरेंच्या शिवसेनेच्या दणक्यानंतर PVR ची माघार

India vs Pakistan PVR Live Streaming : भारत-पाकिस्तान सामना दाखवणे म्हणजे पहलगाममधील सिंदूर उजाडलेल्या महिलांचा अपमान आहे, तो देशद्रोह आहे अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेने घेतली आहे.

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधानंतर पीव्हीआर सिनेमाने (PVR Cinemas) एक पाऊल मागे घेतलं आहे. आशिया कपमध्ये होणाऱ्या भारत आणि पाकिस्तानमधील अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग (India vs Pakistan Live Streaming) करणार नसल्याचं पीव्हीआरकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील पीव्हीआर सिनेमागृहात हा सामना दाखवण्यात येणार नाही.

पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला केला, पहलगाममध्ये निरपराध 26 जणांचा जीव घेतला. त्यामुळे पाकिस्तानसोबत सामना खेळणे, किंवा तो दाखवणे हा देशद्रोह आहे अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाने घेतली होती. पीव्हीआर सिनेमाला त्यांनी इशाराही दिला होता. त्यानंतर पीव्हीआरने या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग होणार नसल्याचं स्पष्ट केलं.

Shiv Sena Opposed To Ind Vs Pak Match : ठाकरे गटाचा विरोध

शनिवारी एक ट्वीट करत पीव्हीआरने देशभरात भारत आणि पाकिस्तान सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यासाठी देशभरात 100 हून जास्त स्क्रिन्सचे नियोजन केल्याचंही सांगण्यात आलं होतं. पीव्हीआरच्या या निर्णयाला शिवसेना ठाकरे गटाने विरोध केला.

Sanjay Raut Tweet On PVR : देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, संजय राऊतांची मागणी

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियातून निशाणा साधला. देशद्रोहाच्या आरोपाखाली पीव्हीआरवाल्यांना अटक करा. भारत पाकिस्तान सामना खेळणे, खेळवणे, दाखवणे, पाहाणे, हा पहलगाममधील सिंदूर उजाडलेल्या महिलांचा अपमान आहे, देशद्रोह आहे. क्रिकेट आणि दहशतवाद एकत्र चालणार नाही. पीव्हीआर, तुमच्याकडे हिंदुतवादी जनतेचे लक्ष्य आहे अशा शब्दात संजय राऊत यांनी इशारा दिला होता.

शिवसेना ठाकरे गटाचा विरोध लक्षात घेता आता पीव्हीआरने आपला निर्णय बदलला आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग महाराष्ट्रात दाखवण्यात येणार नाही असं पीव्हीआरने स्पष्ट केलं. या संबंधी पीव्हीआरचे प्रोग्रामिंग आणि ऑपरेशन्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष थॉमस डिसोझा यांनी शिवसेनेशी संपर्क साधत हा निर्णय कळवल्याची माहिती ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी माध्यमांना दिली.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
अशोक मामांच्या 'साडे माडे तीन'चा पुन्हा कल्ला, टीझर रिलीज; सैराट फेम अभिनेत्री दिसणार प्रमुख भूमिकेत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
OPINION: AQI चा प्रश्न : डेटाच्या कमतरतेनं भारताचा प्रदूषणाविरोधातील लढा संकटात
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
Embed widget