एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यातल्या प्रमुख बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक सुरु
मुंबई : शेतकरी संप अजूनही सुरु ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला असला, तरी आता राज्यातल्या बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याची आवक सुरु झाली आहे. आज सकाळी नाशिक बाजारात 195 ट्रक भाजीपाला पोलीस बंदोबस्तात बाजार समितीत आणण्यात आले, तर नवी मुंबई, आणि पुण्याच्या बाजारपेठेतही भाजीपाल्याची आवक सुरु झाली आहे.
नाशिक बाजार समितीमध्ये आज 195 ट्रक भाजीपाला पोलीस बंदोबस्तात दाखल झाला. तर दुधाचे 95 टँकर पोलीस बंदोबस्तात बाजारात आणण्यात आले. पण भाजीपाला, दुधाच्या गाड्या अडवून त्यांची नासाडी करणाऱ्या तब्बल 150 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांची धरपकड सुरु आहे.
दुसरीकडे नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत काल संध्याकाळी 6 वाजेपासून आज पहाटेपर्यंत तब्बल 977 गाड्या भाज्यांची आवक झाली आहे. यामध्ये 89 ट्रक बटाटा. तर 277 इतर भाजीपाल्याच्या गाड्यांचा समावेश आहेत. तर आज सकाळपासून 27 गाड्यांची आवक झालीय.
विशेष म्हणजे, आज रविवार असल्यानं अशीही भाज्याची आवक कमी असते, त्यामुळं ही आवक स्थिर असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
तिकडं पुणे बाजारात तब्बल 920 भाज्यांच्या गाड्यांची आवक झाली आहे. काल संध्याकाली 6 वाजेपासून ही आवक होण्यास सुरुवात झाली. तर पहाटेपर्यंत ही आवक सुरु होती. यामध्ये 509 गाड्या भाजीपाला, 515 गाड्या कांदा-बटाट, तर 240 फळांच्या गाड्यांचा समावेश आहे.
दरम्यान, शेतकरी संपाला काल नाशिकमध्ये हिंसक वळण मिळालं. नाशिक जिल्ह्यात दळवटला शनिवारी संध्याकाळी टोमॅटोच्या तर रात्री कांद्याच्या ट्रकमधून सर्व माल रस्त्यावर फेकण्यात आला. यावेळी 200 ते 300 जणांच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. तर पांडनेमध्ये आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
निवडणूक
Advertisement