(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jyotiraditya Scindia In kolhapur : कोल्हापुरात लोकसभेला निश्चित कमळ फुलेल; ज्योतिरादित्य शिंदे यांचा विश्वास
कोल्हापुरातील भाजपचे संघटनात्मक काम, कार्यकर्त्यांची उर्जा पाहिल्यानंतर कोल्हापूरमध्ये लोकसभेला निश्चित कमळ फुलेल, असा विश्वास केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला.
Jyotiraditya Scindia In kolhapur : कोल्हापुरातील भाजपचे संघटनात्मक काम, कार्यकर्त्यांची उर्जा पाहिल्यानंतर कोल्हापूरमध्ये लोकसभेला निश्चित कमळ फुलेल, असा विश्वास केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी व्यक्त केला. ज्योतिरादित्य शिंदे लोकसभा मतदारसंघांत आढावा घेण्यासाठी दोनदिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेचा प्रतिसाद पाहता कोल्हापुरात कमळ फुलणार, असा विश्वास आहे. कोल्हापूरसाठी पक्षाने माझी निवड केली आहे. दिलेली जबाबदारी पार पाडण्याचे काम करत आहे. कार्यकर्त्यांबरोबरच समाजातील विविध घटकांशी केलेल्या चर्चेनंतर भाजपने राबविलेले कार्यक्रम आणि विविध उपक्रम जनतेच्या मनावर सखोल ठसा उमटल्याचे जाणवले. महाराष्ट्रात आघाडी सरकार आहे. शिंदे गट व भाजप यांचे सरकार आहे. त्यामुळे जागांबाबत प्रथम राज्यातील नेते चर्चा करतील. वरिष्ठ पातळीवर अंतिम निर्णय घेतले जातील, सध्या संघटनात्मक बाबींवरच अधिक लक्ष आहे.
आज कोल्हापुरात थोर मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. आक्रमणमुक्त भारतासाठी शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे इंग्रज आणि मुघलांपासून लढले आणि यश मिळवले, त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर कायम राहील. pic.twitter.com/T765LGG5zY
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) November 25, 2022
ज्योतिरादित्य शिंदे आज कागलमध्ये
दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे कागल दौऱ्यावर आहेत. त्यांचे आज कागलमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. कागलमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. शिवरायांचा आदर कायम राहिल, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली. तत्पूर्वी, ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटी स्तंभाला अभिवादन करत पुष्पहार अर्पण केला.
कोल्हापुरातील प्रवासादरम्यान आज मिरजकर टेकडी स्तंभावर 1857 च्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहिली!
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) November 25, 2022
कोल्हापुर प्रवास के दौरान आज मिराजकर टेकडी स्तंभ पर 1857 के समस्त शहीदों को नमन किया। @PIBMumbai @BJP4Maharashtra
मार्च 203 पर्यंत नवीन टर्मिनल उभारणार
दरम्यान, कोल्हापूर विमानतळाबाबत बोलताना ते म्हणाले, कोल्हापूर विमानतळाला दोन महिन्यांपूर्वी भेट दिली होती. त्यावेळी त्रुटी दूर करण्याचा शब्द दिला होता. धावपट्टीचे विस्तारीकरण व नाईटलँडिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. टर्मिनल बिल्डिंग मार्च 2023 पर्यंत तयार होईल. कोल्हापूरच्या संस्कृतीला अनुकूल असे डिझाईन केले जाईल. 1 हजार 780 मीटरचा रनवे तयार झाला आहे. 2 हजार 300 मीटरच्या रनवेची गरज आहे. त्यासाठी 64 एकरची जमीन विमानतळ प्राधिकरणाला दिल्यानंतर पुढील कार्यवाही सुरू होईल. एक रस्ता वळवावा लागेल, त्याच प्रमाणे उच्चदाब वाहिन्या आणि महावितरणच्या वाहिनी स्थलांतरीत कराव्या लागतील. मुंबई व बेंगळूर कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न आहे.
हवाई वाहतूक क्षेत्रात काँग्रेसच्या 70 वर्षाच्या काळात जेवढी प्रगती झाली नाही तेवढी प्रगती गेल्या आठ वर्षात झाली आहे. आठ वर्षांपूर्वी 74 विमानतळ हाते. गेल्या आठ वर्षात 69 विमानतळ झाले. कोल्हापूर प्रगती आणि विकासाच्या मार्गावर असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचे त्यासाठी सहकार्य मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या