एक्स्प्लोर
कोजागिरीसाठी आणलेल्या दुधात प्लास्टिकचा चुरा, गाेंदियात खळबळ
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आणलेल्या दुधाच्या पॉकेटमध्ये प्लास्टिक पाडवरचा चुरा आढळल्याचा खळबळजनक प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात समोर आला आहे. हल्दीराम कंपनीचे हे दूध असून 40 लिटर दूध कंपनीला वापस पाठविण्यात आले आहे.

गोंदिया: कोजागिरी पौर्णिमेसाठी आणलेल्या दुधाच्या पॉकेटमध्ये प्लास्टिक पाडवरचा चुरा आढळल्याचा खळबळजनक प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात समोर आला आहे. हल्दीराम कंपनीचे हे दूध असून 40 लिटर दूध कंपनीला वापस पाठविण्यात आले आहे.
गावकऱ्यांनी या प्रकाराची तक्रार मध्यरात्रीच हल्दीराम कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तसेच महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार वेबपोर्टल वर केली आहे. दिवाळी तोंडावर आली असताना विविध दूध कंपन्या किंवा खाजगी व्यापारी दुधात भेसळ करत असल्याचे नेहमी ऐकायला मिळते मात्र मात्र हल्दीरामसारख्या नामांकित कंपनीच्या दुधात देखील भेसळ झाल्याचे समोर आल्याने विश्वास कुणावर ठेवायचा? असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्याच्या धुकेश्वरी देवस्थानात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हल्दीराम कंपनीचे 40 लिटर दूध आणले होते. एका खोल पात्रात ते दूध गरम करण्यासाठी ओतण्यात आले असता त्यातून फायबरसारखा दिसणारा प्लास्टिकचा चुरा आढळल्याने मोठी खळबळ उडाली असून याची तक्रार कंपनीकडे केली असून संबधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने हा दूध वापस पाठविण्याचे ठरविले आहे.
या संदर्भात आपले सरकार पोर्टल वर तक्रार दाखल झाली असून अन्न व सुरक्षा विभागाशी संपर्क केला असता घटना सथळावर जाऊन पंचनामा केल्याशिवाय काहीही बोलू शकत नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
