एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji nagar Crime Bunty Dixit Case: छत्रपती संभाजीनगरमधील फेसबुक किंग बंटी दीक्षितचा भयानक शेवट, मित्रानेच संपवलं, लोखंडी रॉडने चेहरा बिघडवून टाकला

Crime news Bunty Dixit Case: सिडको परिसरात दिवसाढवळ्या बंटी दीक्षित यांना संपवण्यात आले. कारला धडक देऊन हॉकी स्टिकने हल्ला; बजरंग चौकातील घटनेने खळबळ

Crime news Bunty Dixit Case: छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको एन-7 भागात दिवसाढवळ्या एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. देवेश चंद्रेश दीक्षित ऊर्फ बंटी दीक्षित (वय 35) यांच्यावर बजरंग चौकातील वर्दळीच्या रस्त्यावर  हल्ला करण्यात आला. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. आधी कारने बंटी दीक्षित (Bunty Dixit Murder) याच्या स्कुटीला मागून जोरदार धडक देण्यात आली. त्यानंतर रस्त्यावर पडलेल्या बंटी दीक्षित यांच्यावर  हल्ला करण्यात आला. या बेदम मारहाणीत त्यांचा जागीच मृत्यू झाला. (Chhatrapati Sambhaji nagar Crime news)

या हत्याप्रकरणात  पवन पराशर याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. बंटी दीक्षित हे मेस चालवण्यासोबतच प्लॉटिंगचा व्यवसाय करत होते. सामाजिक कार्यातही ते सक्रिय होते. घटनेनंतर सिडको पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. या हत्येमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

Chhatrapati Sambhaji nagar news: फेसबुक किंग बंटी दीक्षितला मित्रानेच का संपवलं?

फेसबुक किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंटी दीक्षित याची त्याच्याच मित्राने भर रस्त्यावर अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची माहिती समोर आली आहे या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर शहरात खळबळ उडाली आहे. काही वर्षांपूर्वी  बंदी दीक्षित हा फेसबुक किंग म्हणून शहरात ओळखला जात होता. फेसबुकची जेव्हा क्रेझ होती, तेव्हा वेगवेगळ्या रिल्स आणि फोटो शेअर करून बंटीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. यामुळे बंटी दीक्षितला सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग होते, तो लोकप्रिय होता. मात्र, नंतर इन्स्टाग्रामचे युग आल्यानंतर फेसबुकचा बादशहा असलेल्या बंटी दीक्षितची तरुणाईतील क्रेझ कमी झाली. बंटी दीक्षित याने इन्स्टाग्रामवरही रिल्स केले. यामध्ये आरोपी आणि त्याचा मित्र पवन पराशर  त्याच्यासोबत असायचा. गुरुवारी बंटी जीममधून परत येत असताना पवन पराशर पाठलाग करत असल्याचे त्याच्या लक्षात आले. एका पान टपरीजवळ बंटीने पवनला पाहिले आणि थांबवले. याठिकाणी दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर बंटी दीक्षित हा आपल्या स्कुटरवरुन घराच्या दिशेने निघाला. मात्र, रागात असलेल्या पवन पराशरने पुन्हा बंटीचा पाठलाग करुन त्याला बजरंग चौकात गाठले. याठिकाणी पवन पराशरने गाडीने बंटीच्या स्कुटीला धडक दिली. 

जोराची धडक बसल्यामुळे बंटी स्कुटरवरून उडाला आणि कारच्या काचेवर आदळून डिव्हायडरवर आदळला. पवनने लगेच पुढे जाऊन  कार रस्त्यावर आडवी लावली आणि लोखंडी रॉड घेऊन कारमधून उतरला आणि बंटीकडे आला. लोखंडी रॉडने बंटीच्या चेहऱ्यावर सपासप वार केले. चेहऱ्यावर वार झाल्यामुळे बंदी दीक्षितने जागेवर जीव सोडला. त्यानंतर पवन हा कारमध्ये बसून निघून गेला.

बंटीची हत्या केल्यानंतर पवन सिडको पोलीस ठाण्यात जाऊन हजर झाला. पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर आणि अतुल येरमे यांनी घटनास्थळी धाव घेतली. बंटीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि घटनास्थळाचा पंचनामा केला. बंटीचा  मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.  पवन पराशरच्या कारमधून चाकू, लोखंडी रॉड जप्त करण्यात आला आहे.

आणखी वाचा

Chhatrapati Sambhajinagar Crime News: जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट, 2 जणांचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगावात थरकाप उडवणारी घटना

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar: कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही; पुण्यातील हल्ल्याच्या घटनेनंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, अधिकाऱ्यांना दिल्या कडक कारवाईच्या सूचना
कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती खपवून घेणार नाही; पुण्यातील हल्ल्याच्या घटनेनंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, अधिकाऱ्यांना दिल्या कडक कारवाईच्या सूचना
Nagpur Cyber Crime: शिंदे पिता-पुत्रांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला शिवसेनेची लीगल टीम धडा शिकवणारा; नागपुरात पहिली तक्रार, 8 जणांविरोधात गुन्हा दाखल
शिंदे पिता-पुत्रांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला शिवसेनेची लीगल टीम धडा शिकवणारा; नागपुरात पहिली तक्रार, 8 जणांविरोधात गुन्हा दाखल
Nagpur Police: नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्यांची आता खैर नाही! IPS विश्वास नांगरे पाटील अॅक्शन मोडमध्ये! विक्रेत्यांसह अल्पवयीन मुलांच्या पालकांना इशारा, थेट...
नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्यांची आता खैर नाही! IPS विश्वास नांगरे पाटील अॅक्शन मोडमध्ये! विक्रेत्यांसह अल्पवयीन मुलांच्या पालकांना इशारा, थेट...
Pune Crime News: पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
पुण्यात आढळली संशयित बॅग; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी, बॉम्बशोधक पथकाकडून परिसरात तपासणी
Advertisement

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC Group C Extension : एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
एमपीएससीच्या 'गट-क' पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यास मुदतवाढ; अर्जाची आणि शुल्क भरण्याची शेवटची तारीख जाहीर
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
Embed widget