एक्स्प्लोर

महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर तातडीने कारवाई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गेल्या शासनाच्या कालावधीत निर्भया फंड मधील निधी खर्च न झाल्याची बाब गंभीर आहे. हा निधी तात्काळ कशा पद्धतीने त्याचा त्वरित विनियोग करता येईल, याची कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. महिला अत्याचाराच्या प्रकरणात तात्काळ व जलद कारवाई करुन गुन्हेगारांना वचक बसेल असे काम करावे.

मुंबई : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (10 डिसेंबर) पोलीस महासंचालक कार्यालयात राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले आहेत. तसेच गेल्या शासनाच्या कालावधीत निर्भया फंड मधील निधी खर्च न झाल्याची बाब गंभीर आहे. हा निधी तात्काळ कशा पद्धतीने  वापरता येईल, याची कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. महिलांवरील अत्याचाराबाबत कठोरात कठोर पावले उचलण्यात यावीत, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र पोलीस दलाच्या कामाची वाखाणणी नुकत्याच पार पडलेल्या देशातील पोलीस महासंचालकांच्या परिषदेत झाली. महिला अत्याचाराच्या प्रकरणात तात्काळ व जलद कारवाई करुन गुन्हेगारांना वचक बसेल असे काम करावे. गेल्या शासनाच्या कालावधीत निर्भया फंड मधील निधी खर्च न झाल्याची बाब गंभीर आहे. हा निधी तात्काळ कशा पद्धतीने त्याचा त्वरित विनियोग करता येईल, याची कार्यपद्धती तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी  ज्या आवश्यक असतील त्या सर्व सुविधा शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येतील. आपल्या सरकारला खाकी वर्दीच्या आतला माणूस मजबूत करायचा आहे, असे देखील मुख्यमंत्री या वेळी म्हणाले. सर्वसामान्य नागरिकांना पोलीसांविषयी आदर आणि त्याचबरोबर दरारा वाटेल अशा पद्धतीने काम करावे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, काही वेळा न्याय मागण्यासाठी सर्वसामान्य नागरिक अहिंसात्मक मार्गाने रस्त्यावर उतरतात. अशा वेळी नोंदविण्यात आलेले गंभीर गुन्हे वगळता साध्या स्वरुपाचे गुन्हे काढून घेण्यासाठी सकारात्मक पावले टाकावीत. अतिशय आवश्यक असेल तेव्हाच बळाचा वापर केला पाहिजे. पोलीसांमुळे नागरिकांचे सण- उत्सव आनंदात पार पडतात, असे म्हणत पोलीसांचे आभार मानले. पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करावेत. त्याला तात्काळ मान्यता देण्यात येईल. पोलीसांच्या घरांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, कर्तव्य कालावधीचे प्रश्न, कर्तव्य सहजतेने पार पाडता येतील यासाठीच्या सुधारणांसाठी प्रयत्नशील राहू. तसेच मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर असून त्याकडे जगाचे लक्ष असते. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वीच शहराच्या सुरक्षिततेसाठी सतत सतर्क रहावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांना सोबत घेणं भाजप कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही, संघाच्या साप्ताहिकाने भाजपला आरसा दाखवला
अजित पवारांना सोबत घेणं भाजप कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही, संघाच्या साप्ताहिकाने भाजपला आरसा दाखवला
Nilesh Lanke : विखे हे कुणाचेच नाहीत हे यावरून सिद्ध, निलेश लंकेंचा विखे कुटुंबीयांना टोला
विखे हे कुणाचेच नाहीत हे यावरून सिद्ध, निलेश लंकेंचा विखे कुटुंबीयांना टोला
बार-बार एकच शरद पवार लावलंय; मनोज जरांगे फडणवीसांवर भडकले, प्रकाश आंबेडकरांनाही प्रश्न विचारले
बार-बार एकच शरद पवार लावलंय; मनोज जरांगे फडणवीसांवर भडकले, प्रकाश आंबेडकरांनाही प्रश्न विचारले
Sharad Pawar on Ajit Pawar : अजित पवार पक्षात परतले तर? शरद पवार म्हणाले, त्यांना घरात जागा, पण पक्षात...
मोठी बातमी : अजित पवार पक्षात परतले तर? शरद पवार म्हणाले, त्यांना घरात जागा, पण पक्षात...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pooja Khedkar : पूजा खेडकर यांचं दिव्यांगाचं प्रमाणपत्र एबीपी माझाच्या हातीSanjay Raut On Eknath Shinde : शिंदेंकडून घोषणांचा पाऊस, राऊत म्हणतात, पाच वर्ष लुटायचं आणि..ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 17 July 2024 Marathi NewsTop 100 Headlines | 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 17 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांना सोबत घेणं भाजप कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही, संघाच्या साप्ताहिकाने भाजपला आरसा दाखवला
अजित पवारांना सोबत घेणं भाजप कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही, संघाच्या साप्ताहिकाने भाजपला आरसा दाखवला
Nilesh Lanke : विखे हे कुणाचेच नाहीत हे यावरून सिद्ध, निलेश लंकेंचा विखे कुटुंबीयांना टोला
विखे हे कुणाचेच नाहीत हे यावरून सिद्ध, निलेश लंकेंचा विखे कुटुंबीयांना टोला
बार-बार एकच शरद पवार लावलंय; मनोज जरांगे फडणवीसांवर भडकले, प्रकाश आंबेडकरांनाही प्रश्न विचारले
बार-बार एकच शरद पवार लावलंय; मनोज जरांगे फडणवीसांवर भडकले, प्रकाश आंबेडकरांनाही प्रश्न विचारले
Sharad Pawar on Ajit Pawar : अजित पवार पक्षात परतले तर? शरद पवार म्हणाले, त्यांना घरात जागा, पण पक्षात...
मोठी बातमी : अजित पवार पक्षात परतले तर? शरद पवार म्हणाले, त्यांना घरात जागा, पण पक्षात...
200 चौरस फुटांचे होर्डिंग 3300 चौरस फुटांचे कसे झाले? आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे
200 चौरस फुटांचे होर्डिंग 3300 चौरस फुटांचे कसे झाले? आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे
'लाडकी बहीण योजने'वर शरद पवार पहिल्यांदाच बोलले; अजित पवारांचं नाव घेत आर्थिक ताळेबंदच संगितला
'लाडकी बहीण योजने'वर शरद पवार पहिल्यांदाच बोलले; अजित पवारांचं नाव घेत आर्थिक ताळेबंदच संगितला
Video : राज ठाकरे 8,10 दिवसांनी, महिन्यांनी जागे झाले की उठतात आणि बोलतात; 'त्या' प्रश्नावर शरद पवारस्टाईल उत्तर, एकच हास्यकल्लोळ
Video : राज ठाकरे 8,10 दिवसांनी, महिन्यांनी जागे झाले की उठतात आणि बोलतात; 'त्या' प्रश्नावर शरद पवारस्टाईल उत्तर, एकच हास्यकल्लोळ
राज्य सरकारनं शरद पवारांना विश्वासात घेतलं नाही यात तथ्य असणं शक्य, नेमकं काय म्हणाले भुजबळ?
राज्य सरकारनं शरद पवारांना विश्वासात घेतलं नाही यात तथ्य असणं शक्य, नेमकं काय म्हणाले भुजबळ?
Embed widget