एक्स्प्लोर

नागपुरात अवैध फेरीवाल्यांची गुंडगिरी, दाम्पत्याला बेदम मारहाण

सिताबर्डी बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांनी एका महिलेला आणि तिच्या पतीला बेदम मारहाण केली.

नागपूर : अवैध फेरीवाल्यांच्या गुंडगिरीचा अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार नागपुरात समोर आला आहे. शहरातील सर्वात प्रमुख आणि अत्यंत गजबजलेल्या सिताबर्डी बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर फेरीवाल्यांनी एका महिलेला आणि तिच्या पतीला बेदम मारहाण केली. 20 फेब्रुवारी रोजी भर दुपारी घडलेला हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. अनेक अवैध फेरीवाले पुजा सोनकुसरे आणि तिचे पती अंकेश यांना मारहाण करतानाची दृष्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. पुजा यांनी सीताबर्डी बाजारपेठेत रस्त्यावर उभे असलेल्या फेरीवाल्याकडून कपडे ( under garments ) खरेदी केले होते. मात्र, ते अपेक्षेप्रमाणे नसल्यामुळे पुजा आपल्या पतीसह ते बदलून घेण्यासाठी 20 फेब्रुवारीला दुपारी पुन्हा त्याच ठिकाणी गेल्या. फेरीवाल्याने खरेदी केले कपडे बदलून देण्यासाठी अतिरिक्त पैशांची मागणी केली. यानंतर फेरीवाले आणि पुजा यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्याच दरम्यान काही फेरीवाल्यांनी अंतरवस्त्रांच्या नावाने अश्लील शेरेबाजी सुरु केली. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या पुजा यांनी तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला. पुजा रस्त्यावर उभी असलेल्या पतीच्या दुचाकीवर बसू लागल्या. तेवढ्यातच फेरीवाल्याने पाठीमागे येत पुजाला भिकारी संबोधलं आणि अंकेश सोनकुसरे यांना जोरदार धक्का मारला. पतीला वाचवण्यासाठी पुजा समोर जाताच फेरीवाल्याने पुजा यांना मारहाण सुरु केली. पत्नीला मारहाण होताना पाहून अंकेश समोर गेले असता अनेक फेरीवाले त्यांच्यावर तुटून पडले आणि जबर मारहाण केली. एका फेरीवाल्याने त्यांना पोटाच्या खालीही मारलं, असा दावा पुजा यांनी केला आहे. घाबरलेल्या सोनकुसरे दाम्पत्याने त्वरित 100 नंबर डायल करत पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. एकानंतर एक तीन कॉल केले. मात्र, पोलीस बरेच उशिरा आले. अखेर पुजा आणि अंकेश यांनी हाकेच्या अंतरावर असलेलं सिताबर्डी पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरुवातीला पोलिसांनीही तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप या दाम्पत्याने केला. तुम्ही हा वाद आपापसात मिटवा, आम्ही तुमचे पैसे परत मिळवून देतो, अशी मांडवलीची भाषा काही पोलिसांनी केली. मात्र सोनकुसरे दाम्पत्य त्यांच्या तक्रारींवर कायम राहिलं आणि त्यांनी वरिष्ठांकडे धाव घेतल्याने रात्री 11 वाजता सिताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये फेरीवाल्यांविरोधात मारहाण, विनयभंग असे गुन्हे नोंदवण्यात आले. दरम्यान, पोलिसांना याबद्दल एबीपी माझाने जाब विचारला असता अजब उत्तर मिळालं. एवढ्या किरकोळ प्रश्नांचीही कशाला बातमी करता, असं म्हणत पोलिसांनी टोलवाटोलवी केली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!
पहिले लग्न, दोन आपत्य, मग घटस्फोट; अशोक खरातने महिलेला ते वाक्य बोलून जाळ्यात ओढलं, पुढे गर्भपातसह हादरवणारं घडलं!
Live Blog Updates: इराणचे नौदल संपले, सर्व मोठे नेते मारले गेले- डोनाल्ड ट्रम्प
Live Blog Updates: इराणचे नौदल संपले, सर्व मोठे नेते मारले गेले- डोनाल्ड ट्रम्प
Hanuman Jayanti 2026: बजरंगबली की जय! हनुमान जन्मोत्सवदिनी माकडांसाठी अनोखी पंगत; अकोला जिल्ह्यातील कोथळी बुजरूक गावात एका रांगेत अन् शिस्तीत आवडत्या मिष्ठानांवर ताव
बजरंगबली की जय! हनुमान जन्मोत्सवदिनी माकडांसाठी अनोखी पंगत; अकोला जिल्ह्यातील कोथळी बुजरूक गावात एका रांगेत अन् शिस्तीत आवडत्या मिष्ठानांवर ताव
Jalna Road Accident: जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू
जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, मजुरांच्या गाडीला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

व्हिडीओ

Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report
Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report
Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime news: सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
Latur Rain Update : लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Share Market : नव्या आर्थिक वर्षाची दणक्यात सुरुवात, शेअर बाजारात एका दिवसात गुंतवणूकदारांची 10 लाख कोटींची कमाई
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात 10 लाख कोटींची कमाई
Donald Trump : इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले  
इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Aditi Tatkare on Ashok Kharat case: राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
Embed widget