एक्स्प्लोर

तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने थेट विशेष पोलिस महानिरीक्षकांना पाठवला गांजा, सोलापुरातील सामाजिक कार्यकत्यांचं पाऊल

तक्रारीची दखल न घेतल्याने शहरातून गांजा खरेदी करुन सोबत तक्रारी अर्ज कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांना पाठवल्याची माहिती सुहास कांबळे यांनी दिली.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टींसाठी चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी रेशन दुकानातील तांदळाच्या काळ्या बाजारासाठी तर आता चक्क गांजाच्या अवैध धंद्यासाठी चर्चेत आलाय. बार्शी शहर आणि तालुक्यात खुलेआम गांजा विक्री होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड. सुहास कांबळे यांनी केला आहे. मात्र तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने थेट विशेष पोलिस महानिरीक्षकांना गांजाची पुडी पोस्टाने कांबळे यांनी पाठवली आहे. अॅड. सुहास कांबळे यांनी बार्शीत चालणाऱ्या अवैध धंद्याबाबत वेळोवेळी पोलिसांना तक्रारी दिल्या होत्या. मात्र तक्रारीची दखल न घेतल्याने शहरातून गांजा खरेदी करुन सोबत तक्रारी अर्ज कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांना पाठवल्याची माहिती सुहास कांबळे यांनी दिली.

यासंदर्भात बोलताना सुहास कांबळे म्हणाले की, "बार्शी शहर आणि जिल्ह्यात अनेक वर्षांपासून बेकायदेशीर धंदे सुरु आहेत. सर्व सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होतो. मटका, दारु आणि गांजा विक्री ही खुलेआम चालते. याठिकाणातील तरुणांनी नेमका काय आदर्श घ्यावा असा प्रश्न पडतो. तरुणांना व्यसनाधिकतेकडे जाण्यापासून रोखण्यासाठी मी पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधिक्षक यांना वेळोवेळी तक्रारी अर्ज दिले आहेत. त्या सोबत उपोषण आणि आंदोलन देखील केले आहेत. मात्र याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे विशेष पोलिस महानिरीक्षक यांना शहरातून विकत घेतलेली गांजाची पुडी आणि तक्रारी अर्ज पाठवला आहे. जर याही पत्राची दखल घेतली नाही तर मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहे."

याप्रकरणी एबीपी माझाने सोलापूर ग्रामीण पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. "बार्शी शहर आणि परिसरात गांजा विक्री होत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावेळी संबिधत लोकांवर पोलिसांनी कारवाई केली होती. याही प्रकरणी संपूर्ण चौकशी करुन तात्काळ कारवाई करण्यात येईल" अशी प्रतिक्रिया पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिली.

लॉकडाऊनच्या काळात सर्व उद्योग बंद असताना अवैधरित्या गुटख्याचे उद्योग सुरु असल्याची बातमी काही दिवसांनी एबीपी माझाने समोर आणली होती. सोलापूर शहरात देखील अनोखी शक्कल लढवून विक्रीसाठी निघालेला अवैध गुटखा पोलिसांनी जप्त केला. सोलापुरातील आसारा चौक परिसरात अवैध गुटख्यानी भरलेला ट्रक निघाल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ट्रक अडवलं असता त्यामध्ये जवळपास 50 मोठी पोती गुटखा असल्याचे आढळले आहे. पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करता यावी यासाठी गुटख्याच्या समोर बेसनची पोती ठेवण्यात आली होती. मात्र पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर त्यांचा हा बनाव उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक कल्याणी तेजमाने वय 40 याच्यासह आणखी एकास ताब्यात घेतलं आहे. सोबतच अंदाजे 21 लाख 60 हजार रुपयांचा गुटखा, गुटखा लपवण्यासाठी वापरण्यात आलेला बेसन आणि ट्रक असा एकूण 35 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. अशाच पद्धतीने राज्यभरात लॉकडाऊनच्या काळात लाखोंचा गुटखा जप्त झाल्याचं समोर आलं आहे. बार्शीत तर चक्क गांजा विक्रीच सुरु असल्याचं उघड झालंय. त्यामुळे राज्यात अंमली पदार्थांच्या अवैधरित्या चालणाऱ्या विक्रीवर कधी कारवाई केली जाणार असा प्रश्न सामान्यांना पडतोय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शक्तीपीठ महामार्ग, अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात 'स्वाभिमानी'कडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारत सरकारचा निषेध
शक्तीपीठ महामार्ग, अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात 'स्वाभिमानी'कडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारत सरकारचा निषेध
Nashik Crime : हॉर्न का वाजवतात? जाब विचारल्यानं गुंडांची सटकली, चौघांकडून ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
हॉर्न का वाजवतात? जाब विचारल्यानं गुंडांची सटकली, चौघांकडून ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
BEST Bus : ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
Tata Power : नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi Nagpur: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुरात, संघ मुख्यालयात लावणार हजेरीABP Majha Marathi News Headlines 08AM TOP Headlines 08AM 30 March 2025Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 30 MarchABP Majha Marathi News Headlines 07AM TOP Headlines 07AM 30 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शक्तीपीठ महामार्ग, अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात 'स्वाभिमानी'कडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारत सरकारचा निषेध
शक्तीपीठ महामार्ग, अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात 'स्वाभिमानी'कडून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारत सरकारचा निषेध
Nashik Crime : हॉर्न का वाजवतात? जाब विचारल्यानं गुंडांची सटकली, चौघांकडून ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
हॉर्न का वाजवतात? जाब विचारल्यानं गुंडांची सटकली, चौघांकडून ज्येष्ठ नागरिकावर जीवघेणा हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
BEST Bus : ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
Tata Power : नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार: IMDचा अंदाज, कोणत्या जिल्ह्याला कधीपासून अलर्ट? वाचा सविस्तर
येत्या 3-4 दिवसात सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, IMDचा अंदाज, गुढीपाडव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अलर्ट, वाचा सविस्तर
Amit Shah : 10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Pandharpur : उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
Embed widget