एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
परप्रांतीय मजूर गावी गेल्यास औद्योगिक कार्यक्षेत्राला मोठा फटका
पालघर जिल्हा प्रशासनाकडे सध्या दीड लाखाच्या आसपास ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्याची माहिती असून त्यापैकी 34 हजार लोकांना पास देण्यात आले आहेत.
पालघर : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देश लॉकडाऊन असून याचा परिणाम देशातील उद्योग व्यवसायावर होण्याची भीती निर्माण झाली आहे. पालघर जिल्ह्यात एकूण आठ औद्योगिक कार्यक्षेत्र असून या कार्यक्षेत्रात जवळपास छोटेमोठे 3600 कारखाने आहेत. कारखान्यांमध्ये साधारण 2 लाख 30 हजार कामगार काम करतात. म्हणजे या मध्ये 30 ते 40 टक्के कामगार हे परप्रांतीय कामगार आहे. सध्या कोरोना संकटामुळे कारखाने बंद होते त्यामुळे हे कामगार भीतीपोटी युपी, बिहार, मध्यप्रदेश या भागात त्यांच्या गावी परतायला लागले आहेत, त्यामुळे ह्याचा परिणाम साहजिकच कारखान्यांवर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.
बोईसर तारापूर, वसई व वाडा हे मोठं औद्योगिक कार्यक्षेत्र असून या भागात मोठ्या प्रमाणात स्टील उद्योग ,इंजिनिअरिंग व इतर अवजड उद्योग असल्याने हे मेहनतीचे काम परप्रांतीय कामगार चांगल्या प्रकारे करु शकतात. हे कामगार आपल्या गावाकडे गेले तर ह्या उद्योगांसमोर मोठं संकट उभे राहणार आहे आणि त्याचा परिणाम कारखान्यांबरोबरच देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर सुद्धा होऊ शकतो त्यामुळे हे स्थलांतर वेळीच रोखणे आवश्यक आहे.
दुसरी कडे पोलीस प्रशासन या गावी परतणाऱ्या मजुरांना थांबवण्यासाठी प्रयत्न करीत आहे ,तरीही हे कामगार थांबण्याचा मनस्थितीत नाही. त्यामुळे ते कोणत्याही मार्गाचा अवलंब करून आपल्या गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पालघर जिल्हा प्रशासनाकडे सध्या दीड लाखाच्या आसपास ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्याची माहिती असून त्यापैकी 34 हजार लोकांना पास देण्यात आले आहेत. तर अनेक मजूर मिळेल त्या वाहनाने किंवा पायी गावी परतत आहेत. एकूणच विचार केला तर हे परप्रांतीय मजूर त्यांच्या गावाकडे गेले आणि पुन्हा परतले नाही तर जिल्ह्यातील औद्योगिक कार्यक्षेत्राला मोठा फटका बसण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.
Coronavirus | चंद्रपुरात कोरोनाच्या भीतीने सख्ख्या आईने मुलगा, सून आणि नातवंडाला घरात प्रवेश नाकारला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
मुंबई
करमणूक
राजकारण
Advertisement